शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:49 IST

दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञाचा अभाव : शस्त्रक्रियेचा दहा लाखांचा खर्च व्यर्थ ठरण्याची पालकांना भीती, अधिष्ठात्यांकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.जन्मत: कर्णबधीर असलेल्या मुलांना बोलण्याचे कौशल्य अवगत होत नाही. अशा मुलांवर पालकांनी साडेदहा लाख रुपयांची जुळवाजुळव करून यशस्वी शस्त्रक्रियाही करून घेतली. मात्र शस्त्रक्रियेनंतर जवळपास तीन वर्षापर्यंत या मुलांना नियमित स्पीच थेरपी घ्यावी लागते. यवतमाळ जिल्ह्यात स्पीच थेरपीची सर्वोत्तम सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे. त्यामुळे घाटंजी, वणी, उमरखेड, पुसद, महागावसारख्या गावातील पालक आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना येथील मेडिकलमध्ये आणतात.आजपर्यंत मेडिकलमध्ये डॉ. नीता मेश्राम यांनी अतिशय उत्तम स्पीच थेरपी दिली. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांच्या सहायकाची लातूर येथे बदली झाली. तर डॉ. मेश्राम यांच्याकडे अन्य विभागाचाही अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्पीच थेरपीसाठी वेळ देणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शस्त्रक्रिया झालेले जवळपास ३० चिमुकले दररोज तर काही जण दर आठवड्याला थेरपीसाठी मेडिकलमध्ये येत आहे. मात्र थेरपी मिळत नसल्याने दिवसभर वाट पाहून सायंकाळी परत जात आहे. अखेर त्रस्त पालकांनी शुक्रवारी अधिष्ठातांकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी तात्पुरता टेक्निशीयन नेमण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे अधिष्ठातांनी पालकांना सांगितले. मात्र ही जागा तातडीने न भरल्यास चिमुकल्यांचे भवितव्य संकटात सापडण्याची भीती आहे.बोलण्यात वाढतेय व्यंगशस्त्रक्रिया झालेले ३० चिमुकले स्पीच थेरपीसाठी मेडिकलच्या चकरा मारत आहे. शस्त्रक्रिया न झालेलेही तेवढेच चिमुकले थेरपीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अर्धवट ऐकू येणारे, गतिमंद अशा मुलांचाही समावेश आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन वर्ष नियमित थेरपी न घेतल्यास मुलांच्या बोलण्यात व्यंग निर्माण होते. गेल्या दीड महिन्यांपासून स्पीच थेरपीमध्ये खंड पडत असल्यामुळे काही मुलांचे बोलणे चुकत आहे. आंबा म्हणताना आबा असा उच्चार होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.मी रोजमजुरी करून आणि शासकीय मदत मिळवून माझ्या तीन वर्षाच्या मुलीवर नागपुरात शस्त्रक्रिया केली. आता स्पीच थेरपीसाठी यवतमाळच्या मेडिकलमध्ये मुलीला नियमित घेऊन जातो. मात्र दीड महिन्यांपासून संबंधित डॉक्टरची सेवा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.- मोहम्मद अमीर शेखपालक, कुऱ्हाड ता. घाटंजी