शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

लोहारा विभागात गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाऱ्या प्रभागांमध्ये गटारगंगा तयार झाल्या आहेत. या विभागात येणाºया जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ही समस्या आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव जीवघेणा ठरत आहे.दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाºया लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे. परंतु अगदी प्रवेशद्वारावरच भल्यामोठ्या खड्ड्यात सांडपाणी साचलेले आहे. यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. एकवीरा चौकात एका सदनिकेचे सांडपाणी सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावरून वाहते. तकलादू उपाय याठिकाणी केले जातात. विशेष म्हणजे या भागात सांडपाणी काढून देण्यासाठी मोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. सांडपाणी त्याठिकाणी सोडण्यासाठी आवश्यक तो उपाय केला गेलेला नाही. याच मार्गावर तिरूपतीनगराकडे जाणाºया वळणावर सांडपाण्यात अक्षरश: पिण्याच्या पाण्याचा वॉल आहे. हा गंभीर प्रश्न सोडविण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही.लोहारा बायपासवर असलेल्या अहिल्यानगरी, राऊतनगर, मैथिलीनगर या भागातील गटारांना अक्षरश: तळ्याचे स्वरूप आलेले आहे. लोकांच्या अगदी घराला लागून सांडपाणी थोपले गेले आहे. वसाहती निर्माण होण्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. नागरिकांनी वैयक्तिकरित्या शोषखड्डे तयार करून पाणी जागीच मुरविण्याचा केलेला प्रयत्नही फार काळ टिकलेला नाही. नगरपरिषदेकडून नाल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. दिला तरी अतिशय तोकडा असतो. दुसरीकडे गटार योजना येत असल्याने नाल्या बांधायच्या नाही, असे धोरणच असल्याचे सांगितले जाते. भूमिगत गटार योजना पूर्ण होईपर्यंत असाच त्रास सहन करायचा काय, हा नागरिकांचा प्रश्न आहे.वॉर्डाशी संबंधित काही नगरसेवकांना या समस्यांशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. समस्या मांडल्यानंतर कितीतरी दिवसपर्यंत दखल घेतली जात नाही. प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना लोकांचे प्रश्न सोडविले जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे.भूमिगत गटार योजना नाहीयवतमाळ शहरात राबविल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेतूनही लोहारा विभागातील जवळपास प्रभागांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळाले नाही. वास्तविक या भागात गटारांनी कहर केला आहे. दारव्हा रोडवर असलेल्या काही वसाहतींमधील सांडपाणी रेल्वे रुळाच्या बाजूला सोडून देण्यात आले आहे. प्रामुख्याने लोहारा बायपासवर असलेल्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची समस्या मोठी आहे. मात्र याविषयी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी जवळच मोठा नाला आहे. त्यादृष्टीने इतर उपाययोजनांची गरज आहे.खड्डामय रस्तेनगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाºया अनेक भागात खड्डामय रस्त्यांची मालिका सुरू झाली आहे. तीन ते चार फुटांचा पसारा असलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. डागडुजी करण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. नगरसेवकही गंभीर नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषण