शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

By अविनाश साबापुरे | Updated: July 16, 2023 07:37 IST

हजारो पदे रिक्त : नव्या अटीने विषय जागा भरण्याचा पेच अजून कठीण

अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे; परंतु आता पदोन्नती प्रक्रियेसाठीही टीईटीचे बंधन घातल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे; परंतु या अटीमुळे विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे कठीण झाले आहे.

सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षक नेमणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. दहा वर्षांत भरतीची प्रक्रियाच न झाल्याने या नेमणुकाही रखडल्या. सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने पदोन्नतीकरिता संघटनांनी प्रशासनाकडे धोशा लावला आहे. आता पदोन्नतीकरिता पदवीधरसोबतच टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना  तशा तोंडी सूचनाही दिल्या आहेत.

प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अंमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.

हजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेश आरटीईनुसार विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली; परंतु आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती मिळाली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही. 

ही पदोन्नती की पदस्थापना?nएनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय, यावरून शिक्षक, प्रशासनात मतप्रवाह आहेत. एखाद्याला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना, असा प्रश्न पुढे आला आहे. nआरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना, तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे; परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांचा आहे, तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून होत आहे. 

एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यांतील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. येथे पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे; हा तिढा महिनाभरात सुटण्याची चिन्हे आहेत.  - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.

 

टॅग्स :Teacherशिक्षकexamपरीक्षाzp schoolजिल्हा परिषद शाळा