लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी स्वामिनी दारूमुक्ती आंदोलनाच्यावतीने जिल्हाभर धरणे देण्यात आले. यवतमाळच्या तिरंगा चौकात दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये गाडून घेत महिलांनी अभिनव आंदोलन केले.दारूमुळे संसाराची राखरांगोळी झाली. नवरा घरी दारू पिऊन आला की, मनात धस्स होते. घरात तमाशा होईल याची चिंता लागलेली असते. यामुळे दारूपासून आम्हाला मुक्ती द्या, असे म्हणत जिल्हाभरातील महिलांनी आंदोलन केले. दारूतून मिळणाºया पैशासाठी सरकारने दारू विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. मात्र आमचे संसार दारूत बुडून गेले आहे. दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यवतमाळ येथील तिरंगा चौकात दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये एका महिलेने स्वत:ला गाडून घेतले होते. यावेळी अनेक महिला हातात फलक घेऊन दारूबंदीची मागणी करीत होते. यावेळी स्वामिनीचे संयोजक महेश पवार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक बोधडे, योगेश राठोड, प्रज्ञा चौधरी, वंदना राऊत, रुपेश वानखडे, माला ठाकरे, अरुणा बावणे, प्रवीण राहिले, दिनकर चौधरी, सुमेध भेले, छाया इंगळे, पुष्पा काळे, उषा रॉडरी, तारा दातार, तुकाराम राऊत, आकाश पाटील, मंगेश मातकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.नेर तहसीलसमोर धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, सुशीला परोपटे, गणेश केवटे, बेबीनंदा पाटील, नंदा बनसोड, सिंधू लोटे, नानूबाई सहारे, बंटी मालविय यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. दारव्हा तहसीलसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात शेखर सरकटे, प्रतिभा अजमिरे, विठ्ठलराव उके, सचिन मुधोळ, नीलेश राऊत, विजय चव्हाण, अरविंद जाधव, स्वप्नील मापारे, रणजित झोंबाडे, नरेंद्र भोयर उपस्थित होते. राळेगाव येथे स्वामिनीचे तालुका संयोजक बालाजी कदम यांच्या नेतृत्वात गुरुदेव सेवा मंडळ, राजे शिवशाहू महाराज संस्था, प्रियदर्शनी ग्रामीण विकास संस्था, प्रेरणा ग्रामीण संस्था, जिल्हा नशाबंदी शाखा, उमेद प्रकल्प आदींचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यासोबतच उमरखेड येथे दारूबंदीसाठी महिलांनी चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. कळंब येथेही महिलांनी आंदोलन करून दारूबंदीची मागणी केली.
दारूबंदीसाठी स्वामिनींचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:07 IST
संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी स्वामिनी दारूमुक्ती आंदोलनाच्यावतीने जिल्हाभर धरणे देण्यात आले. यवतमाळच्या तिरंगा चौकात दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये गाडून घेत महिलांनी अभिनव आंदोलन केले.
दारूबंदीसाठी स्वामिनींचे धरणे
ठळक मुद्देजिल्हाभर आंदोलन : दारू बॉटलच्या ढिगाऱ्यात महिलांनी घेतले गाडून