शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरावर रुग्णवाहिकांसह दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:31 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता.

ठळक मुद्दे‘मेडिकल’मधून बाहेर काढल्याचा रोष : अभ्यागत मंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी महाविद्यालयातील सर्व रुग्णवाहिका घेऊन चालक पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक स्थित निवासस्थानावर धडकले. यावेळी शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर आम्हाला काढण्याऐवजी तेथे पर्यायी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या रुग्णवाहिकांच्या आंदोलकांनी केली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून बाहेर काढले जात असल्याने जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर रुग्णवाहिकांसह धडक दिल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. अभ्यागत मंडळाचे सदस्य तथा यवतमाळ नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रा. प्रवीण प्रजापती यांनी या रुग्णवाहिका रुग्णांना लुटत असल्याचा आरोप मंडळाच्या बैठकीत केला होता. नागपुरातील एक डॉक्टर या रुग्णवाहिका चालकांना मॅनेज करतो, म्हणून या रुग्णवाहिका रुग्णांना त्याच डॉक्टरच्या दवाखान्यात भरती करतात, असा आरोप प्रजापती यांनी केला होता. त्यावरूनच या रुग्णवाहिका महाविद्यालयाच्या बाहेर काढण्याचा निर्णय अभ्यागत मंडळाने घेतला होता. गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरावर अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.यावेळी रुग्णवाहिका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कामठे, उपाध्यक्ष संतोष मेश्राम, सचिव मनोज लुटे, बिपीन चौधरी, संतोष मेश्राम, सागर राऊत, चंदन नित, मोहन कामठे, राजू गोफने उपस्थित होते.या आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकांच्या रांगा लागल्याने दत्त चौकातील वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली होती. पालकमंत्र्यांच्या घरापुढे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र पोलिसांनी पुढाकार घेऊन काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.रुग्णाला आंदोलनाचा फटकारुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनाचा फटका रुग्णाला बसला. बरबडा येथील सुलोचना राठोड यांना उपचारासाठी वर्ध्याला नेले जाणार होते. मात्र आंदोलनामुळे त्यांचा अर्धा तास खोळंबा झाला. यानंतर रुग्णवाहिका रुग्णाच्या उपचाराकरिता नियोजीत दवाखान्याकडे रवाना झाली....तर रुग्णवाहिका गावाबाहेर जाणार नाहीरुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नावर योग्य निर्णय न झाल्यास बहिष्कार आंदोलन कायम राहणार आहे. यामुळे अपघात, मृत्यू अथवा कुठल्याही घटनेत रुग्णाला बाहेरगावी नेले जाणार नाही, असा इशारा संघटनेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारYawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज