शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:03 IST

पालकमंत्री मदन येरावार यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेत विविध योजनांचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना खडेबोल

जिल्हा परिषद : आरोग्य, समाज कल्याणवरून खडाजंगी, विविध योजनांचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पालकमंत्री मदन येरावार यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेत विविध योजनांचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्याचवेळी पदाधिकाऱ्यांचे अज्ञानही पुन्हा एकदा उघड झाले. पालकमंत्री मदन येरावार यांनी गुरूवारी स्थायी समिती सभागृहात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यात घरकूल, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, धडक सिंचन विहिरी, शौचालये, समाजकल्याण विभाग आदींची स्थिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी नगरपरिषद हद्दीतील १७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुसरीकडे स्थलांतरीत करण्यावरून खडाजंगी झाली. शासनाचा तसा आदेशच नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसा आदेश असेल, तर एक तासांत सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. मात्र तसा आदेश सादर केल्यानंतर तो मान्य करण्यास नकार दिला. समाजकल्याण विभागात नऊ कर्मचारी बाहेरचे असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या विभागाकडे दोन कोटी रूपये अखर्चित राहिल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात ९१३ ग्रामपंचायतींमध्ये एक लाख ८० हजार ४४९ शौचालये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून तूर्तास केवळ १२ हजार १६५ शौचालये पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालकमंत्री येरावार यांनी पंतप्रधान घरकूल योजनेचाही आढावा घेतला. समाकल्याणतर्फे पंचायत समितींना भजनी साहित्य केवळ कागदोपत्री पुरविण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले. त्यावर साहित्याची तपासणी काल केली नाही, बीडीओंनी पोचपावती कशी दिली, त्यांच्याविरूद्ध कारवाई का केली नाही, आदी प्रश्नांची सरबत्ती येरावार यांनी केली. बांधकाम विभागालाही त्यांनी व्ही.आर., ओ.डी.आर, एम.डी.आर रस्त्यांबाबत माहिती विचारली. कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर यांनी जिल्ह्यात सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असल्याचे सांगितले. किरकोळ दुरूस्तीसाठी अत्यंत तोकडा ७४ लाखांचा निधी मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पालकमंत्र्यांनी पुढील वर्षात रस्ते दुरूस्ती अथवा नवीन रस्त्यांसाठी अत्यंत कमी निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली. या बैठकीला सीईओ दीपक सिंगला यांच्यासह अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती निमिष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे आणि जिल्हा परिषद सदस्य रेणूताई संजय शिंदे, गजानन बेजंकीवार आदी उपस्थित होते. मात्र कोणत्याही पक्षाचे गटनेते बैठकीला उपस्थित नव्हते. सभापतीच्या पतीची बैठकीत लुडबूडआढावा बैठकीला शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण सभापती उपस्थित होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या पतींनी बैठकीत घुसखोरी केली होती. सभापतींपेक्षा त्यांचे पतीच अनेकदा मुद्दे उपस्थित करताना आढळले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ते कथन करीत होते. त्यावर पालकमंत्र्यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या कानपिचक्या दिल्या. यावेळी काही पदाधिकाऱ्यांचे अज्ञान उघड झाले. पालकमंत्री खनिज विकास निधीच्या वाटपाच्या निकषांची वारंवार माहिती देत असताना सभापती आपलाच मुद्दा रेटत होते. त्यावरूनही पालकमंत्री अक्षरश: वैतागले होते.अर्ध्या आश्रमशाळांना टाळे लावणारसमाजकल्याण विभागात बाहेरील तब्बल नऊ कर्मचारी कार्यरत आहे. त्यांचे वेतन संबंधित संस्थेतून निघते. ते येथे कसे काय काम करतात, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी विचारला. संबंधित संस्थेतील त्यांचे काम कोण करते. ते अतिरिक्त आहेत काय. कुणाच्या स्वाक्षरीने ते येथे आले. त्यांची संबंधित संस्थेत खरच गरज आहे काय. आदी प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला. आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती स्थापन करून अशा कर्मचाऱ्यांच्या शोध घेतला जणार असून त्यातून आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा आढावा घेणार असल्याचे येरावार यांनी सांगितले. यातून अर्ध्याअधिक आश्रमशाळांना टाळे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.