शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत दोन शेतकºयांची सामुहिक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 14:17 IST

शेतीत काही पिकले नाही, पºहाटीचे बोंडही पाण्याने सडले आणि लोकांचे देणे-घेणे कसे करावे, या विवंचनेत असणाºया दोन शेतकºयांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली.

ठळक मुद्देदोघेही एकमेकांचे व्याहीलक्ष्मीपूजनाला गावात चूल पेटली नाही

सुदाम दारव्हणकरआॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतीत काही पिकले नाही, पºहाटीचे बोंडही पाण्याने सडले आणि लोकांचे देणे-घेणे कसे करावे, या विवंचनेत असणाºया दोन शेतकºयांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली. विशेष म्हणजे हे दोनही शेतकरी नात्याने एकमेकांचे व्याही आहेत. या घटनेने लक्ष्मीपूजनाला गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही की दिवाळी सणही साजरा केला नाही.वासुदेव विठोबा रोंगे (६७) आणि वासुदेव कृष्णराव राऊत (६५) दोघेही रा.वाठोडा (ता.पांढरकवडा) अशी मृत शेतकºयांची नावे आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवारी हे दोघेही राऊत यांच्या घरी बसले होते. शेतीवर चर्चा सुरू होती. शेतीने कसा दगा दिला, असे म्हणत या दोघांनीही अचानक एकत्र विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनाही करंजीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रोंगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु काही वेळात रोंगे यांचाही मृत्यू झाला. दिवाळीच्या दिवशीळा पसरली. गावात कुणीही दिवाळी साजरी केली नाही. सायंकाळी अंत्यसंस्काराला परिसरातील शेकडो नागरिक आले होते.वासुदेव रोंगे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्यावर ७० हजाराचे कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तर वासुदेव राऊत यांच्याकडे १५ एकर शेती असून खासगी सावकाराचे त्यांच्यावर कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्या होत आहे. परंतु सामूहिक आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ होय. विशेष म्हणजे, रोंगे आणि राऊत हे एकमेकांचे व्याही असून रोंगे यांची मुलगी राऊत यांच्या मुलाला दिली होती. या घटनेने संपूर्ण पांढरकवडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी