शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकान म्हणजे नशापाणीचे ठिकाण नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक दुकानात येतील. यामुळे नफा तर सोडाच, अधिक नुकसान होईल आणि सर्वसामान्य नागरिक दुकानात येण्यापासून दूर जातील.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने किराणा दुकानामधून वाईन विक्री करण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय सध्या तरी निघालेला नाही. मात्र, या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप नोंदविला जात आहे. किराणा व्यावसायिकांनीही या निर्णयावर रोष व्यक्त केला आहे. नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक दुकानात येतील. यामुळे नफा तर सोडाच, अधिक नुकसान होईल आणि सर्वसामान्य नागरिक दुकानात येण्यापासून दूर जातील. यामुळे दुकान आणि माॅलमधून वाईन विक्री करणे योग्य नाही, याबाबत सरकारने फेरविचार करावा, असे मत किराणा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. मॉल चालकांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.

बदनामीच जास्तकिराणा दुकानातून वाईन विक्री करण्यासाठी शासनाचा आदेश निघणार होता. या आदेशामुळे सरकारची मोठ्या प्रमाणात नाचक्की होत आहे. किराणा दुकानात असे वाईन विकले तर लोक येणार नाहीत.

 अध्यादेश निघालाच नाही

राज्य शासनाने किराणा दुकानातून वाईन विकण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, त्याचा आदेश निघाला नाही. यामुळे सध्या तरी या ठिकाणावर किराणा मालच मिळणार आहे. याशिवाय वाईन विक्री करायची की नाही, याबाबतचा निर्णय दुकानदाराला घ्यायचा आहे.

किराणा दुकानदार म्हणतात...

वाईन विक्री करणे यासाठी किराणा दुकान उघडलेले नाही. या ठिकाणी छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण खरेदीकरिता येत असतो. वाईन विकली तर ते नशापाणीचेच दुकान होईल. अशा प्रकाराला आम्ही मान्य करणार नाही. - नंदलाल मंगतानी

हे शक्य नाही, अती उच्च दर्जाच्या व्यक्तींसाठी वाईनसारखा प्रकार विक्रीला येतो. यातून महसूल मिळावा, हा उद्देश आहे. मात्र, आम्हाला जीवनावश्यक वस्तूच विकायच्या आहे. यामुळे किराणा दुकानातून अशा वस्तू विकल्या जाणार नाही. - रितेश ठाकरे

 

टॅग्स :liquor banदारूबंदी