ज्ञानेश्वर इंगोले : पुसद येथे तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथीपुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून समाज जीवनातील विविध विषयांना हात घातला. शिक्षण, महिलोन्नती, कुटुंब, ग्रामविकास, तंटामुक्ती, जीवनकला, शेतकरी आदींबाबत त्यात चिंतन आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर इंगोले यांनी येथे केले. स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने येथील देशमुखनगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ४८ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘मानवतावादी संत तुकडोजी महाराज’ या विषयावर इंगोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी गुरुदेव भक्तांनी रांगेत बसून शिस्तबद्धपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. सामूदायिक प्रार्थना, ध्यान, सामूदायिक नमस्कार, ग्रामगीता वाचन, राष्ट्रवंदना आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. त्यानंतर गुरुदेव प्रेमींनी राष्ट्रसंतांची खंजिरी भजने सादर संगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ पुसद तालुका शाखेचे नंदकुमार पंडित, शरद देशपांडे, ज्ञानेश्वर ताकतोडे, माधव जाधव, मनोहर बनस्कर, बाबासाहेब वाघमारे, गजानन जाधव, भाऊ बोपीनवार, ऋषभ तोडसाम, नागोराव तोडसाम, साहेबराव राठोड, भाऊ सोनटक्के, नरेश ढाले, प्रभाकर चव्हाण, अनिल अस्वार, संभाजी बळी, दशरथ सूर्यवंशी, प्रमोद जयस्वाल, राजवीर जयस्वाल, अॅड.वीरेंद्र देशमुख, छाया लामणे, ताई ढाले, ताई तोडसाम, ताई वाघमारे, वैष्णवी लामणे आदी उपस्थित होते. भजनात तबल्यावर भाऊ सोनटक्के, मनोहर बनस्कर, हार्मोनियमवर ज्ञानेश्वर ताकतोडे, ऋषभ तोडसाम यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
By admin | Updated: October 23, 2016 02:01 IST