यवतमाळ : प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा, धर्म आणि शब्दांचीही चिकित्सा करणारा प्रत्येक माणूस फुले-आंबेडकरी ठरतो. शोषणाच्याविरुद्ध पेटणारा, स्वत:चा धर्म पाळून विकतचा मध्यस्थ टाळणारा फुले-आंबेडकरवादी ठरतो, अशी सुटसुटीत व्याख्या ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. येथे शनिवारी आयोजित महात्मा फुले अभिवादन सभेत ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मंगला दिघाडे, सविता हजारे, दीपक नगराळे, नरेंद्र फुलझेले, ज्ञानेश्वर गोबरे, देवीदास अराठे, राजेंद्र कठाळे, डॉ. विजय कावलकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी अभिवादनपर विचार मांडले. महात्मा फुले यांना अभिवादन करणाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष सुभाष राय, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, रावसाहेब पालकर, डॉ. विजय अग्रवाल, दत्ता चांदोरे, उमाकांत परोपटे, न.शा. पवार, अंकुश वाकडे, अपुर्वा सोनार, मायाताई गोबरे, सुनंदा वालदे, ललिता वाघ, डॉ. हेमंत म्हात्रे, डॉ. अभय बेलसरे, उज्ज्वला इंगोले, धम्ममित्रा टेंभुर्णे, नारायण स्थूल, प्रिया वाकडे, महेंद्र पिसे, ज्योती केने, प्रशांत खडतकर, अशोक मोहुर्ले, किशोर भगत, योगेश उडाखे, नानासाहेब हुड, मधुकर चर्जन, वर्षा मेहत्रे, नितीन अराठे, विनोद इंगळे, शशीकांत थेटे, डॉ. मनवर, ज्योती निरपासे, सिंधुताई धवने, डॉ. स्मिता गवई, अॅड. राजेंद्र महाडोळे आदींचा समावेश होता.संचालनाची जबाबदारी दीपक वाघ यांनी पार पाडली. आभार क्रांतिसूर्य माळी युवा मंचचे अध्यक्ष मनोज गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. स्वप्नील मदनकर, डॉ. लंगडे, निशिकांत थेटे, संजय येवतकर, संजय ठाकरे, कैलास ढुमने, रवी फसाटे, अजय निकोडे, नंदू धनस्कर, गणेश इंगळे, श्रीकांत खडतकर, राजू मालखेडे, गजानन हजारे आदींनी पुढाकार घेतला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
महात्मा फुले यांना अभिवादन
By admin | Updated: April 12, 2015 00:01 IST