शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाखो सौरदिव्यांतून जग करणार महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:40 IST

भारतासह १८० देशातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी स्वत:च्या हाताने सौरदिवे तयार करून महात्मा गांधींना कृतिशिल अभिवादन करणार आहेत.

ठळक मुद्देमुंबई आयआयटीची मोहीम १८० देशातील विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी कार्यशाळा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अहिंसेचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जगभरात साजरी होणार आहे. भारतासह १८० देशातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी स्वत:च्या हाताने सौरदिवे तयार करून महात्मा गांधींना कृतिशिल अभिवादन करणार आहेत.पर्यावरणाची हानी टाळणे हीदेखील एकप्रकारची अहिंसाच आहे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यासाठी मुंबई आयआयटीने सुरू केलेल्या ‘गांधी जागतिक सौरयात्रा’ मोहिमेला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे.येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे खास शालेय विद्यार्थ्यांसाठी सौरदूत कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. भावी पिढीला हवामान बदलाबाबत जागृत करणे, पर्यावरण जतन आणि संरक्षण या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे अशा हेतूने गांधी जागतिक सौरयात्रा मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेचा मुख्य कार्यक्रम म्हणून २ ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये एकाच वेळी ‘विद्यार्थी सौरदूत कार्यशाळा’ घेतली जाणार आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या हाताने कमीत कमी एक सौरदिवा तयार करणार आहे. तो कसा तयार करावा, याबाबत कार्यशाळेतच मार्गदर्शन केले जाणार आहे. हा दिवा तयार करण्यासाठी ५०० ते ५५० रुपयांचे साहित्य लागणार असून ते विद्यार्थ्यांनी स्वत: आणायचे आहे. शिवाय सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यासाठी १० रुपयांचे शुल्कही भरावे लागणार आहे.या कार्यशाळेत ११ वर्षे व त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांना सहभागी करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड(पुणे) यांनी सोमवारी दिले.

गिनिज बुकात नोंदविशेष म्हणजे, २ ऑक्टोबर २०१८ पासूनच मुंबई आयआयटीने ही मोहीम सुरू केली. २०१८ मध्ये अशाच प्रकारे सौरदूत कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी देशातील दीड लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या उपक्रमाची गिनिज बुकात जागतिक विक्रम म्हणून नोंदही घेण्यात आली. आता २०१९ मधील कार्यशाळा तब्बल १८० देशात राबविली जात आहे. त्यामुळे नवा विक्रम स्थापित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी