शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांसाठीचे कार्य महान पुण्यकर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:39 IST

समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे महान पुण्यकर्म आहे. विधूर, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे,....

ठळक मुद्देराजुदास जाधव : राज्यस्तरीय सर्वधर्मीय परिचय मेळावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे महान पुण्यकर्म आहे. विधूर, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी केले.निर्मिक महिला विकास मंडळ, निवृत्त अभियंता मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा येथे निवृत्त अभियंता भवनात घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद अजमिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, गोपाळ भास्करवार, नीरज डफळे, भारत सोधी, सतीश भोयर, महादेव कोडापे, गजानन भांडवलकर, प्रा. काशीनाथ लाहोरे आदी उपस्थित होते.समाजामध्ये स्वार्थी प्रवृत्ती बोकाळली आहे. समाजसेवासुद्धा आजकाल काही तरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते. परंतु उपेक्षितांचे लग्न जुळवून त्यांना सामाजिकदृष्ट्या भक्कम आधार देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आयोजित हा मेळावा नक्कीच आदर्शवत आहे, असे राजुदास जाधव यावेळी म्हणाले. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांनीही आयोजकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.मेळाव्याचे आयोजक नरेश उन्हाळे यांनी प्रास्ताविक केले. १२ वर्षात १३६ विधवा, घटस्फोटित, अपंग मुला-मुलींचे लग्न लाऊन दिल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मेळाव्यात विवाहबद्ध झालेल्या काही जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विजय साबापुरे यांनी केले. महिलांचा परिचय प्रा. सविता हजारे यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.