शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा परिक्षेत्रातील वनसंपदेची प्रचंड हानी

By admin | Updated: May 5, 2016 02:38 IST

यवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खुलेआम अवैध वृक्षतोड, गौण खनिज उत्खननमुकेश इंगोले  दारव्हायवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून त्यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असल्याच्या तक्रारी आहे. वेळीच या प्रकारांना पायबंद घातला गेला नाही तर वनसंपत्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड, माती, गौण खनिजाची चोरी आणि वन्यजीवांची हत्या करण्याच्या घटना घडत आहे. मात्र त्या तुलनेत संबंधितांविरुद्ध कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या वन परिक्षेत्रात मौल्यवान वृक्ष, बिबट, लांडगे, कोल्हे, हरीण, काळवीट, निलगाय, ससे, मोर, रोही आदी वन्यप्राणी व मोठ्या प्रमाणात लाल माती, खनिज संपत्ती, तसेच वन औषधी आहे. परंतु या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण होत नसल्याने त्यावर अनेकांकडून घाला घातला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. शहरालगतचा वन परिसर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केल्या जाते. अधूनमधून एखादी कारवाई दाखविली जाते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वृक्षतोडीसाठी कारवाई नगण्य असल्यामुळे यासाठी चोरट्यांना मूकसंमती तर दिली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो.त्याचबरोबर वन जमिनीवरील मातीची चोरी, अवैध गौण खनिज उत्खनन केल्या जाते. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. हे सर्व डोळ्यासमोर असूनसुद्धा अधिकारी मात्र झोपेत आहे. यापूर्वी या भागात लागोपाठ तीन बिबट मृत्युमुखी पडले होते. तसेच मोराची शिकार होत असल्याचे उघडकीस आले होते. याचा अर्थ या वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची शिकार करणारे सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. परंतु या शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना आखलेल्या दिसत नाही. मध्यंतरीच्या काळात वन माती नाला बांध, वन्यजीव पाणी साठवण तलाव, वनतळे आदी कामांकरिता लाखो रुपयाचा निधी आला होता. परंतु यातील काही कामे नियमबाह्य करण्यात आली व कामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. सध्याच्या तीव्र तापमानात जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. याचा शिकारी फायदा घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र अधिकाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखे त्यांचे वागणे आहे. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना बदलीचे वेधयेथील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. नाल्हे यांना सध्या बदलीचे वेध लागल्याचे वन विभागात बोलले जात आहे. त्यांच्या बदलीच्या मानसिकतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचारीवर्गात चर्चील्या जात आहे. तसेही त्यांना अनेकदा संपर्क साधला तेव्हा यवतमाळ येथील मिटींग इतर कामकाज, न्यायालयीन कामे असल्याने बाहेरगावी असल्याचे उत्तर मिळते. त्यामुळे विभागाच्या कामासाठी त्यांना कधी वेळ मिळतो हे सांगणे कठीण आहे.