शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा-आजी, नातीला घरात डांबून चोरट्यांनी साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले. पुढच्या खोलीचे ही दार बंद केले. जेणे करून कुणाला जाग आली तरी बाहेर पडता येणार नाही अशी व्यवस्था चोरट्यांनी केली. नंतर दोन कपाट फोडून त्यातील रोख दीड लाख, साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व ५० हजारांचे चांदीचे शिक्के, भांडी असा मुद्देमाल लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले असतानाही चोरटे बिनधास्तपणे खिडक्या तोडून आत शिरत आहे. पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये साडेतीन लाखांची रोख रक्कम आहे. ही घटना मंगळवारी रात्री २.३० वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे याच परिसरात आठ दिवसापूर्वी चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती. सेवानिवृत्त टेलिकॉम अधिकारी अशोक मूलचंद मोटवाणी हे आपल्या पत्नी, मुलगा, सून व नातींसह राहतात. मुलगा व सून वरच्या मजल्यावर झोपतात. तळमजल्याला मोठ्या नातीसह अशोक मोटवाणी व त्यांच्या पत्नी राहतात. मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले. पुढच्या खोलीचे ही दार बंद केले. जेणे करून कुणाला जाग आली तरी बाहेर पडता येणार नाही अशी व्यवस्था चोरट्यांनी केली. नंतर दोन कपाट फोडून त्यातील रोख दीड लाख, साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व ५० हजारांचे चांदीचे शिक्के, भांडी असा मुद्देमाल लंपास केला. पहाटे ५ वाजता मोटवाणी यांच्या पत्नी उठल्या. त्यांना दार उघडत नव्हते. पतीला ही बाब सांगितली. त्यांनीही प्रयत्न केला. दार काही केल्या उघडत नव्हते. अखेर बेडरूम मधून बाहेरच्या बाजूने असलेला दरवाजा उघडून घराचे मुख्य दार उघडले. तरी किचनला लागलेला दरवाजा तोडून प्रवेश करावा लागला. चोरीची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली. मोटवाणी यांच्या घरी येण्यापूर्वी चोरट्यांनी पुष्पकुंज सोसायटीतीलच रामदास राजगुरे यांच्या घराच्या खिडकीची ग्रील काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास संपूर्ण ग्रील काढून झाली असता शेजारी राहणारे प्रकाश गुल्हाने यांना जाग आली. त्यांनी आवाज दिल्याने चोरांनी तेथून पळ काढला. 

लाकडी फ्रेममध्ये लावलेली ग्रील धोकादायक - जुन्या घराच्या बांधकामांमध्ये खिडक्यांच्या लाकडी फ्रेममध्ये ग्रील स्क्रूने बसविली जात होती. अशा प्रकारची ग्रील काढणे अगदीच सहज सोपे आहे. शहरातील सर्वच घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी ग्रील काढून आतमध्ये प्रवेश केला आहे. नागरिकांनी अशा ग्रील बदलवून त्या सहजासहजी निघणार नाही अशी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. 

 

टॅग्स :Thiefचोर