उमरखेड : जैन समाजाचे आराध्य व २४ वे तीर्थंकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातून भव्य रथयात्रा काढण्यात आली. यावेळी जैन समाजातील महिला-पुरुषांनी रथयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. शहरातील आठवडी बाजारमधील जैन मंदिर येथे मंगळवार, १९ एप्रिल रोजी सकाळी अभिषेक करून पूजा करण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. आठवडी बाजार, नाग चौक, गायत्री चौक, हनुमान मंदिर, स्वामीच्या मठाचा मार्ग अशा मार्गाने ही मिरवणूक शहरात मार्गक्रमण करीत होती. गेल्या अनेक वर्षांपासून उमरखेड शहरात भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी जैन समाज बांधवांनी मंगळवारी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. संपूर्ण कुटुंबासह जैन बांधवांनी मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यावेळी जैन मंदिर समितीचे अध्यक्ष अनिल अन्नदाते, मनोहर महाजन, विलास कस्तुरे, बाबूराव महाजन, अॅड. संतोष जैन, सतीश भागवते, शांतीलाल जैन, इंदरचंद जैन, अभय जैन, दिलीप रेदासनी, गौतम झांबड, डॉ. धर्मीचंद बाफना, पप्पू जैन, विनोद जैन, आदेश जैन, किशोर सकलेचा, हर्षल बाफना, संदीप जैन, श्रणिक जैन, धर्मीचंद रेहदासनी, प्रवीण जैन, पंकज जैन, मुन्ना जैन, सुदेश जैन, राजेंद्र अन्नदाते, महावीर महाजन, आनंद जैन, चेतन जैन, आशीष जैन आदींसह जैन समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या उत्सवामध्ये सहभाग नोंदविला. भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह शहरातून वाजतगाजत मिरवणूक निघाली. या मिरवणुकीने उमरखेड शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. (शहर प्रतिनिधी)
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त उमरखेड शहरात भव्य रथयात्रा
By admin | Updated: April 20, 2016 02:36 IST