शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

तीन गावांत ग्रामसमाधान शिबिर

By admin | Updated: September 19, 2015 02:22 IST

नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी, खरडगाव, दोनद येथे ग्रामसमाधान शिबिर पार पडले. यावेळी गावातील कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, ...

पालकमंत्री : कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यवतमाळ : नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी, खरडगाव, दोनद येथे ग्रामसमाधान शिबिर पार पडले. यावेळी गावातील कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी नेर पंचायत समितीचे सभापती भारत मसराम, माजी सभापती परमानंद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार शरयू आढे, सरपंच बाळासाहेब पन्नासे, प्रभाकर अघम, गटविकास अधिकारी जी.एस.भगत यांच्यासह विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. गावातील निराधार अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणे, अन्नसुरक्षेचा लाभ देणे, कुटुंबांकडे शौचालयाचे बांधकाम, घरकुल, पाणी पुरवठा यासह कुपोषणमुक्तीसाठी शिबिरातून प्रयत्न केले जात आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी असल्यास सादर कराव्या, असे पालकमंत्री म्हणाले. वीज जोडणी, ट्रान्सफार्मर, रेशनकार्ड, फेरफार, अतिक्रमण नियमाकूल करणे आदी प्रकारच्या तक्रारी व अर्ज ग्रामसमाधान शिबिरामध्ये सादर झाले होते. या तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ग्रामसमाधान शिबिरानिमित्त गावांमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थी आणि बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रमही घेण्यात आला. त्याचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह नेर पंचायत समितीचे माजी सभापती परमानंद अग्रवाल तसेच सरपंचांनी त्या-त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. (स्थानिक प्रतिनिधी)