शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

वणीच्या नगरपरिषद हद्दीत ग्रामपंचायतीची घुसखोरी

By admin | Updated: January 17, 2015 23:07 IST

येथील नगरपरिषदेच्या क्षेत्रात लालगुडा ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ घेऊन व्यवसाय थाटण्याचा धंंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे व शासनाचे नुकसान होत आहे.

वणी : येथील नगरपरिषदेच्या क्षेत्रात लालगुडा ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ घेऊन व्यवसाय थाटण्याचा धंंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे व शासनाचे नुकसान होत आहे. वणी नगरपरिषदेला लागून लालगुडा गावाची हद्द आहे. वणीत नगरपरिषदेची स्थापना ब्रिटिशांच्या काळात सन १९२४ मध्ये झाली. त्यावेळी लालगुडा गावातील काही सर्व्हे नंबर नगरपरिषद हद्दीमध्ये टाकण्यात आले होते. यापैकी सर्व्हे नंबर ३/१ ‘अ’मध्ये गणेश जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान, ठाकुरवार यांचे दोन बिअर बार व सिनेमा टॉकीज, तसेच सर्व्हे नंबर ६ मध्ये मदान यांच्या बीअर बारला लालगुडा ग्रामपंचायतीने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. बांधकामांनासुद्धा लालगुडा ग्रामपंचायतीनेच परवानगी दिली आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांनी या बीअर बारांना खानावळीची परवानगी दिली तसेच काही घरांच्या बांधकामांना व ले-आऊटमध्ये कूपनलिका खोदण्यासही परवानगी दिली. त्यामुळे नगरपरिषदेचे नुकसान झाले. बीअर बार ग्रामीण क्षेत्रात आल्याने वार्षिक शुल्कसुद्धा शहरापेक्षा कितीतरी कमी भरत आहे. त्यामुळे शासनाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार नगरसेवक पी.के. टोंगे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व दारूबंदी विभागाकडेही तक्रार केली होती. मात्र या विभागांनी त्या तक्रारीची दखलच घेतली नाही. परिणामी खोट्या ‘ना हरकती’वर सुरू झालेल्या बीअर बार व दारूची दुकाने बंद करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)