शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना मिळाला विकासकामांसाठी निधी; या वर्षातील पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:38 IST

Yavatmal : बंधित, अबंधितसाठी ५३ कोटी रुपये प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी वित्त आयोगाकडून थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. या वर्षातील १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा झाला असून, पदाधिकारी जोमात आले आहे, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकराज असल्याने त्यांना मात्र निधीपासून वंचितच राहावे लागले आहेत.

वित्त आयोगाचा ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत असल्याने मालामाल होत आहे. त्यातुलनेत जिल्हा परिषद व पंचायत समितींची केवळ दहा टक्क्यांवरच बोळवण होत आली आहे. अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासकराज आहे. यामुळे त्यांना या निधीवर पाणी फेरावे लागत आहे. नुकताच बंधित व अबंधित कामासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. २०२४-२५ या वर्षातील हा पहिलाच हप्ता आहे. निधी कधी मिळणार याकडे गावपुढाऱ्याचे लक्ष लागले होते. मात्र, निधी मिळाल्याने त्यांना गावात विकासकामे करता येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामाचे प्रस्ताव तयार करून वर्क ऑर्डर काढण्याचा खटाटोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे.

बंधितसाठी ३२ कोटी ४३ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून सार्वजनिक शौचालय, बंदिस्त नाली, कंपोस्ट खत, शोष खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आदी कामे करता येणार आहेत.

आठ ग्रामपंचायतींना नाही मिळाला निधी प्रशासकराज असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींना  १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही. जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने त्यांनाही निधी मिळाला नाही. बंधित व अंबधित बाबींवर खर्च करण्याचे निर्देश असतात.

१५ व्या वित्त आयोगाचे अखेरचे वर्ष मार्च २०२० मध्ये १४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला. त्यानंतर पाच वर्षासाठी एप्रिल २०२०-२१ ते मार्च २०२४-२५ साठी १५ वा वित्त आयोग आला. त्याचाही कालावधी मार्च २०२५ मध्ये संपणार असून, त्यानंतर १६ वा वित्त आयोग सुरू होणार आहे. 

कात्री लावल्याचा संशयग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वित्त आयोगाचा निधी येतो. यंदा हा निधी सप्टेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला. नेहमीपेक्षा कमी निधी जमा झाला. निधीला कात्री लावल्याचा संशय ग्रामसेवकां- कडून व्यक्त होत आहे,

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgram panchayatग्राम पंचायत