शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामपंचायत संगणक परिचालक संपावर

By admin | Updated: December 4, 2014 23:15 IST

पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यवतमाळ : पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना महाआॅनलाईन कंपनी तुटपूंजे वेतन देत असून, तेही अटी-शर्ती लादून. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्रात ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या नावाने करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर संगणक देण्यात आले असून, त्यातून पंचायतराज बळकटीकरण आणि कारभारात सुसूत्रता आणण्याचा हेतु आहे. परंतु याठिकाणी नियुक्त केलेल्या संगणक परिचालकांना महाआॅनलाईन कंपनी योग्य वेतन देत नाही. २०११च्या जनगणनेनुसार एक हजार लोकसंख्ये पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पूर्ण वेळ संगणक परिचालक नियुक्त करण्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यासाठी आठ हजार रुपये मानधन देण्याचेही निश्चित करण्यात आले. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील संगणक परिचालकांना योग्य रक्कमच दिली जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून संगणक परिचालक अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करीत आहे. आता तर शासनाचे कोणतेही परिपत्रक नसताना महिन्याला ४५० डाटा एंट्री करणे कंपनीने सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास मानधन मिळणार नसल्याचे सांगत आहे. तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयका मार्फत हा प्रकार सक्तीचा केला आहे. दर दिवसाची हजेरी युनीटी आयटीच्या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते मात्र मानधन दिले जात नाही. या सर्व प्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने आवाज उठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचयतीतील संगणक परिचालक २ डिसेंबरपासून संपात सहभागी झाले आहे. कंत्राटी पद्धत (महाआॅनलाईन कंपनी) रद्द करून संगणक परिचालकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, शासन निर्णयानुसार प्रतिमाह आठ हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)