महाविद्यालयाचे संस्था सचिव विजय मोघे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर वऱ्हाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, डॉ. अरूण दसोडे उपस्थित होते. आयुष्यात यशस्वी शिखरे पादाक्रांत करताना आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही, आपण ग्रहण केलेले ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. वऱ्हाटे यांनी व्यक्त केला. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराची कास धरून पुढील वाटचाल करावी, असा मोलाचा संदेश डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी दिला. यावेळी डॉ. अरूण दसोडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रत्येक शाखेतून दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पदवी प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कला शाखेतून रजनी मुमुलवार, प्राची म्यानेवार, वाणिज्य शाखेतून पायल चव्हाण, अक्षय सिडाम, विज्ञान शाखेतून अपूर्वा रासमवार, यश बिजेवार या यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. राहुल दखणे यांनी केले, तर आभार डॉ. उल्हास राठोड यांनी मानले. यावेळी डॉ. प्रवीण गांजरे, डॉ. गजानन फुटाणे, प्रा. नितीन वासनिक उपस्थित होते. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने संपन्न झालेल्या या पदवी प्रदान समारंभात कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेचे विद्यार्थी तथा महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविला.
शिवरामजी मोघे महाविद्यालयात पदवीदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST