शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल साहेब, बीटीचे नवे तंत्रज्ञान द्या; शेतकरी घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:42 IST

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देबोंडअळीच्या आक्रमणाने कपाशीचा खरीप हंगाम बुडाला

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बीटीच्या नव्या तंत्रज्ञानाची या कापूस उत्पादकांंना प्रतीक्षा आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळातील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारत लोकार्पणासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. कुलपती विद्यासागर राव यांनी आपल्या चारही कृषी विद्यापीठातील तमाम संशोधकांना बियाण्यांच्या नव्या संशोधनाची जबाबदारी द्यावी, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. या विद्यापीठांनी बियाण्यांबाबत खरोखरच किती संशोधन केले, हाच मुळात संशोधनाचा विषय ठरावा, अशी विदारक स्थिती आहे. विदर्भात कृषी विद्यापीठ असतानाही तेथील संशोधकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या नाही. शेतकऱ्यांना सक्षम पर्याय उभे करून देता आलेले नाही.बीटी तंत्रज्ञानाचा दावा करणाऱ्या कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. आतापर्यंत पाना-फुलावर दिसणारी ही अळी यावेळी चक्क बोंडाच्या आत शिरली. त्यामुळे बीटी बियाणे कंपन्यांचे दावे फोल ठरले. शेतकरी देशोधाडीला लागला. कपाशीवर आलेल्या अळ्यांचा कीटकनाशक फवारणीद्वारे मुकाबला करताना खुद्द शेतकरीच धारातिर्थी पडले. यंदाचा हंगाम पूर्णत: बेकार गेला. कपाशीच्या शेतात ट्रॅक्टर घालून उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांना आता पुढील हंगामाची चिंता सतावू लागली आहे. कृषी विद्यापीठांनी बीटीचे नवे तंत्रज्ञान हंगामापूर्वी शोधून काढावे, त्यासाठी राज्यपालांनी स्वत: संशोधकांच्या खांद्यावर ही जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळेच बुधवारी राज्यपाल काही दिलासादायक घोषणा करतात काय याकडेही नजरा लागल्या आहेत.

पर्यायी पीक द्या, अथवा दराची हमी द्याशेतकऱ्यांना कापसाच्या पिकाचा पूर्णत: अभ्यास आहे. यामुळे कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कापसाला पर्यायी पीक लावायचे झाले तर त्या पिकाचे हमीदर निश्चित असणे गरजेचे आहे. लागवडीपूर्वीच हे दर जाहीर झाल्यास शेतकरी त्या दृष्टीने विचार करतील.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी