शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:05 IST

येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आर्णी येथे महिलांना शिलाई मशीनचे वाटप, सर्वपक्षीय स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ना.अहीर यांनी केंद्र शासनाने विविध क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत असल्याचेही स्पष्ट केले. जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात यापुढे कुणीही बेघर राहणार नसून आवश्यक तेथे रस्ता, वीज, पाणी पोहोचविल्याचे सांगितले. देशाच्या सीमेवर तथा देशातही केंद्र सरकार जोरात काम करीत असल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे दशाचे चित्र पालटत असल्याचा दावा त्यांनी केला. विविध योजनांमुळे अनेकचे आयुष्यच पालटल्याचे त्यांनी सांगितले. ना.नितीन गडकरी यांच्यामुळे देशात रस्ते विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ना.अहीर यांच्या हस्ते तालुक्यातील २३ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बांधकाम कारागिरांना साहित्य खरेदीसाठी निधी प्रदान केला. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध विकास कामांचा आलेख सादर केला.कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, ज्येष्ठ नेते उद्धवराव येरमे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, आर्णी किराणा एसोसिएशनचे भिकूभाई पटेल, विपीन राठोड, बाळासाहेब चावरे, विनीत माहुरे, काँग्रेसचे उद्धवराव भालेराव, भाजपाचे विशाल देशमुख, दीपक वानखेडे यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष उपस्थित होते. संचालन कैलास राऊत, तरा आभार विपीन राठोड यांनी मानले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर