शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांना मदतीस शासकीय कर्मचाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:02 IST

केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे.

ठळक मुद्देथेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणार नव्या पेन्शन योजनेचा आठ लाख कर्मचारी काढणार वचपा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कापू नये, असे लेखी नकारपत्र या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना लादल्याचा वचपा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून कर्मचारी रस्त्यावर उतरून झगडत आहे. मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. डीसीपीएसमुळे कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या कुटुंबीयांची अजीबात काळजी न करणारे महाराष्ट्र शासन आता आमच्याकडून केरळच्या मदतीसाठी पैसे कापण्यासाठी कसे सरसावले, असा प्रतिप्रश्न नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक अशा जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांचा या संघटनेत समावेश आहे. संघटनेने केरळसाठी वेतन कपातीस लेखी नकारपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांकडे हे नकारपत्र सोपविले आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाऱ्या जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू न करणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी केरळ मदतीस नकार देत असल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी सांगितले.

थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणारमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना वेतनातून मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अनुभव वाईट असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकऱ्यांना मदतीच्या नावाने वेतन कपात करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना २०० ते ४०० रुपयेच देण्यात आले. त्यामुळे आता केरळच्या मदतीसाठी आमच्या वेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे घेतले जाऊ नये, त्याऐवजी आम्ही राज्यस्तरावर निधी एकत्र करून थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करू, असे मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी व्यक्त केले.

सरकारवर नफेखोरीचा आरोपमहाराष्ट्र सरकार केरळ पूरपीडितांना २५ कोटी मदत देणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार आहे. राज्य शासनाचे जवळपास १८ लाख कर्मचारी असून त्यांच्या वेतन कपातीतून शासन सुमारे २७५ कोटी जमा करणार आहे. त्यामुळे केरळला मदत देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासन चक्क २५० कोटींचा नफा करून घेणार आहे, असा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नेते करीत आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर