लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन आमदार राजू तोडसाम यांना येथे देण्यात आले. बहुतांश शिक्षक दहा वर्षांहून अधिक काळ एकाच शाळेवर कार्यरत आहेत. सदर निर्णयानुसार बदल्या झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून सेवा देणारे शिक्षक, ५३ वर्षांवरील शिक्षक, विधवा, घटस्फोटीत, पती-पत्नी एकत्रीकरण याबाबत हा निर्णय सकारात्मक आहे. मात्र या निर्णयानुसार बदल्या होताना दिसत नाही. निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देताना अनंत चौधरी, सुधाकर राठोड, विलास राठोड, प्रेमानंद नगराळे, भास्कर वेट्टी, मनोहर गेडाम, अनिता वºहाडे, पवन निबुदे, अजय मंगाम, विलास चिकराम, अशोक मोहुर्ले, आर.एस. उमाटे, व्ही.सी. खोब्रागडे, के.यू. मालवीय, मो.एकलाख मो.इशाख, प्रतिभा प्रतापवार, रेणुका टेकाम, संगीता गेडाम, मारोती कनाके, डी.डी. पुसनाके यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.
शासन निर्णयानुसारच बदल्या व्हाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:35 IST
शासनाने २७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन आमदार राजू तोडसाम यांना येथे देण्यात आले.
शासन निर्णयानुसारच बदल्या व्हाव्या
ठळक मुद्देशिक्षकांचे निवेदन : घाटंजी येथे आमदारांकडे मांडला प्रश्न