शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्लास वनची नोकरी लागली, जातचोरीने गेली; एमपीएससी परीक्षेतील यशावर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 07:10 IST

कठोर अभ्यास करुन एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशावर जातचोरीने पाणी फेरले.

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन एका तरुणाला कृषी उपसंचालक म्हणून नोकरी मिळाली. सोमवारी कृषी विभागाने नवनियुक्त क्लास वन अधिकाऱ्यांची विभाग यादी घोषित केली. पण, अवघ्या दोनच दिवसात म्हणजे १३ डिसेंबर रोजी या तरुणाने जातचोरी केल्याचा प्रकार उघड झाला. त्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात आले. त्यामुळे कठोर अभ्यास करुन  एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशावर जातचोरीने पाणी फेरले.

दुसऱ्या उमेदवाराचा दावाऋषिकेशचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करून आपल्याला नियुक्ती मिळावी, यासाठी अमित तुमडाम या उमेदवाराने अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांना निवेदन दिले आहे. अमित हा एमपीएससी परीक्षेत ऋषिकेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शाळेतील अभिलेखात केली खाडाखाेडऋषिकेश बिभीषण बोधवड असे या तरुणाचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील वर्ग एकची पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर ऋषिकेश बोधवड याची निवड झाली. 

मात्र, याच निवड यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमित फुलचंद तुमडाम (रा. फुलझरी, ता. रामटेक, जि. नागपूर) या उमेदवाराने बोधवडच्या अनुसूचित जमातीच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. तर आता १३ डिसेंबर रोजी ऋषिकेश बोधवडचा कोळी महादेव जमातीचा दावा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवून त्याचे जात प्रमाणपत्र जप्त केले. 

त्याने जेथे शिक्षण घेतले, त्या शाळेतील अभिलेखात जातीच्या रकान्यात पूर्वीची जात खोडून वेगळ्या शाईने व वेगळ्या हस्ताक्षरात ‘म. को.’ ‘म. कोळी’ लिहिल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली. त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना प्राधिकृत केले आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा