शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गोरीपान राणी जेव्हा ठरवून काळा जोडीदार निवडते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 21:40 IST

मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठणारी ही काहाणी. यवतमाळपासून मुंबईपर्यंतचे स्त्रीजगत ढवळून काढणारी.

ठळक मुद्देमहिलांच्या वैचारिक प्रगतीची कहाणी । टीव्ही मालिकेतून मनोरंजन होता-होता अचानक झाले मनपरिवर्तनही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक मुलीच्या स्वप्नातला राजकुमार असतो राजबिंडा, तगडा, गोरापान..! तिच्याही स्वप्नात असाच गोरापान राजकुमार होता. ती तर चक्क ‘राणी’. रुपाचीही अन् गुणांचीही! तिच्या स्वप्नातला जोडीदार तर अत्यंत देखणाच होता. गोरापानच नवरा मिळावा म्हणून तिने चालून आलेली तीन-चार स्थळं धुडकावलीही. पण एक दिवस अचानक तिचे मत पालटले अन् तिने चक्क काळा जोडीदार निवडला... का केले तिने असे? कसा झाला हा बदल?मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठणारी ही काहाणी. यवतमाळपासून मुंबईपर्यंतचे स्त्रीजगत ढवळून काढणारी.तर... एक आहे मुलगी, राणी तिचे नाव. नागेश्वर भुते यांची ही लाडकी कन्या. खूप शिकली. शिकून कम्प्यूटर इंजिनिअर झाली. मुलीचे वय २७ वर्षांचे झाले म्हणून वडील जावई शोधू लागले. पण राणीच्या मनातला राजकुमार काही सापडेना. तिला हवा होता देखणा, गोरापान पती. सोयरिक घेऊन येणारी मुले कमावती होती, पण रूपानं जरा अशी-तशीच. म्हणून राणीने अनेकांना नकार दिला.पण मंडळी, परिवर्तन घडविण्यासाठी एखादी साधी गोष्टही मोठे काम करून जाते कधी कधी. तीच गोष्ट राणीच्या बाबतीत एका टीव्ही मालिकेने केली. ‘रंग माझा वेगळा’ ही कहाणी तिने मालिकेत पाहिली. त्यात काळ्या मुलीला नवराच मिळेना. तिची तगमग, कुचंबणा पाहून राणीच्या मनात प्रकाश पडला. अरेच्चा! ही तर आपलीच कहाणी! काळा-गोरा रंग बघण्यापेक्षा माणसाचे गुण पाहिले पाहिजे. मग तिने ठरविले आपण करायचा तर काळाच नवरा करायचा. अन् झालेही तसेच. यवतमाळातीलच अनुराग कवडूजी मिसाळ हा तरुण एक दिवस तिच्या आयुष्यात आला. तोही राणीसारखाच इलेक्ट्रिकल इंजिनियर. शिवाय, जगदंब इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही त्याची स्वत:ची कंपनी असून तो खासगी कंत्राटदार आहे. दोघं एकमेकांशी बोलले. मनं जुळले. अन् वर्णभेदाचे साखळदंड गळून पडले. आता येत्या २२ मार्चला गोरी राणी-काळा अनुराग यांच्या लग्नाचा बार धुमधडाक्यात उडणार आहे.मालिकेचे कलाकारही चकित!‘रंग माझा वेगळा’ टीव्ही मालिकेत काळ्या मुलीचा समाजाकडून होणारा दु:स्वास दाखविला जातोय. पण हीच काल्पनिक कहाणी पाहून यवतमाळातल्या एका मुलीने चक्क काळा जोडीदार निवडला, ही बाब कळताच मालिकेतील कलाकारही चकित झाले. त्यांनी राणी आणि अनुरागला चक्क मुंबईत बोलावून मालिकेच्या सेटवर त्यांचा सन्मान केला.