शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वन व्यवस्थापनाच्या हिशेबात गौडबंगाल

By admin | Updated: November 13, 2014 23:07 IST

यवतमाळ वनवृत्तातील वन व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात शासनाची लाखो रुपयांची रक्कम अनेक वर्षांपासून पडून असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या समित्यांनी हा निधी खर्चही केला नाही

वनवृत्तात ९९१ समित्या : लाखोंचा निधी पडून, आॅडिटही नाहीयवतमाळ : यवतमाळ वनवृत्तातील वन व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात शासनाची लाखो रुपयांची रक्कम अनेक वर्षांपासून पडून असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या समित्यांनी हा निधी खर्चही केला नाही किंवा शासनाला परतही केला नाही. या निधीच्या खर्चात गौडबंगाल असल्याचीही माहिती आहे. यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी २ नोव्हेंबरला पांढरकवडा, ३ ला पुसद, ४ ला अकोला तर ५ नोव्हेंबरला यवतमाळ वनविभागाची आढावा बैठक घेतली. त्यात अवैध वृक्षतोड, बीट निहाय स्थिती, वन गुन्हा प्रकरणांचा निपटारा, वन गुन्ह्यांची नोंदणी, न्यायालयीन प्रकरणे, जप्त वाहने व त्यांची विल्हेवाट, साहित्य खरेदी, दोषारोपपत्र, प्रलंबित प्रकरणे, वन जमिनीवरील अतिक्रमण, त्यांची न्यायालयीन प्रकरणे, जमीन महसूल कारवाई, कॅम्पाअंतर्गत पर्यायी वनीकरण व रोपवन कामे, पूर्व पावसाळी कामे, रोपवाटिका, उपचार नकाशे अंदाजपत्रके, कुपांची तोडणी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीला दिलेले अनुदान, झालेला खर्च, शिल्लक रकमा आदी मुद्यांवर आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर प्रकार उघडकीस आले. यवतमाळ वनवृत्तातील चार विभागात ९९१ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. त्यामध्ये अकोला विभागात २३५, पांढरकवडा २४१, पुसद २४५ तर यवतमाळ वन विभागातील २७० वन व्यवस्थापन समित्यांचा समावेश आहे. त्यातील १५७ समित्या शंभर टक्के कार्यरत आहेत. ३७८ समित्या काही प्रमाणात कार्यरत आहेत. मात्र तब्बल ४५६ वन व्यवस्थापन समित्या सक्रियच नसल्याचे दिसून आले. १९९८ पासून वनवृत्तात वन व्यवस्थापन समित्या टप्प्याटप्प्याने स्थापन करण्यात आल्या. गावातील प्रत्येक कुटुंबातील एक जण या समितीचा सदस्य असून त्यातूनच कार्यकारी समिती निवडली गेली. त्यापैकीच एक या समितीचा अध्यक्ष ठरला. तर सचिवाची जबाबदारी वनपालाकडे देण्यात आली. अध्यक्ष-सचिवांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनाचा निधी खर्च केला गेला. त्याचे आॅडिटही झालेले नाही. हा निधी वापरला गेला नाही किंवा शासनाला परतही केला गेला नाही. समितीचे सचिव असलेल्या काही वनपालांची बदली झाली, कुणी सेवानिवृत्त झाले तर काही निलंबित झाले. त्यामुळे या समित्यांचेच आर्थिक व्यवस्थापन कोलमडले. या समित्यांच्या निधीवर संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी उपवनसंरक्षकांची होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या सर्वबाबी मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांच्या आढावा बैठकीत उघड झाल्यानंतर त्यांनी संबंधित वन अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या समित्यांमार्फत खर्च झालेल्या निधीतही बऱ्याच भानगडी असल्याचे समजते. आॅडिटच झाले नसल्याने या भानगडी व आर्थिक गोंधळावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आजही सक्रिय असलेल्या समित्यांना त्यांच्या उद्दीष्ट व मागणीच्या प्रस्तावानुसार शासन निधी देते. मात्र त्याचे नियमित आॅडिट होत नसल्याने गैरव्यवहार दडपले जात असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)