शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्याने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:01 IST

शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक संजय रमेश कैपिल्यवार यांनी शुुक्रवारी दुपारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देआत्महत्येमागील कारणांचा शोध

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक संजय रमेश कैपिल्यवार यांनी शुुक्रवारी दुपारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सराफा व्यापाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.सराफा व्यवसायी, बिल्डर व कंत्राटदार, असा संजय कैपिल्यवार यांचा व्यावसायिक प्रवास आहे. कधीकाळी शहरातील क्रमांक एकचे सराफा व्यापारी म्हणून त्यांचा लौकिक होता. गेल्या काही वर्षापासून ते कंत्राटदार म्हणून काम करीत होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार अनुभवले. त्यामुळे कुठल्याही परिस्थतीला तोंड देणारा दिलदार मित्र म्हणून त्यांची शहरात ओळख होती.त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे सर्वांनाच कोडे पडले आहे. धामणगाव मार्गावरील राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये त्यांनी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून घेतला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी शेजाºयांच्या मदतीने त्यांना रूग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कैपिल्यवार यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी वृत्तलिहेपर्यंत पोलिसांनी कोणतीच नोंद घेतली नव्हती.संजय कैपिल्यवार यांच्या आत्महत्येने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.