लोहारालगतची घटना : हाताला दुखापतयवतमाळ : गुराख्याच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याने पंजाला गंभीर दुखापत झाल्याची घटना येथील लोहारा एमआयडीसी परिसरामागील जंगलात बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.उमेश मनोहर राऊत (२७) रा. देवीनगर लोहारा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे उमेश एमआयडीसी परिसरातील जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. शेळ्या चारत असताना त्याला एक वस्तू दिसली. सहज म्हणून त्याने ती उचलली. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने ती वस्तू फोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक स्फोट झाला. यात त्याच्या डाव्या हाताचा पंजाला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची माहिती लोहारा पोलीस ठाण्यात देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिरासे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच बॉम्ब शोध नाशक पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात शेत होते. या शेतात वन्यप्राण्यांना मारण्यासाठी गावठी बॉम्ब तयार करून ठेवला असावा आणि तोच उमेशच्या हातात लागला असावा. (कार्यालय प्रतिनिधी)
गुराख्याच्या हातात फुटला गावठी बॉम्ब
By admin | Updated: May 12, 2016 02:40 IST