शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

गॉडसन डेव्हलपर्सला दिल्लीतही चपराक

By admin | Updated: February 22, 2016 02:36 IST

ले-आऊटला अकृषक मंजूरी नसताना भूखंड विक्री करणाऱ्या यवतमाळातील मे. गॉडसन लँड डेव्हलपमेंट कंपनीला दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही दणका दिला आहे.

ग्राहक आयोगाकडून ताशेरे : दोन रिव्हिजनवर प्रत्येकी १० हजार दंडयवतमाळ : ले-आऊटला अकृषक मंजूरी नसताना भूखंड विक्री करणाऱ्या यवतमाळातील मे. गॉडसन लँड डेव्हलपमेंट कंपनीला दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही दणका दिला आहे. या कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहे. शिवाय त्यांचे रिव्हीजन खारिज करताना दोन रिव्हीजनवर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्या. जे.एम. मलिक आणि सदस्य डॉ. एस.एम. कांतीकर यांनी १४ जानेवारी २०१६ रोजी हा निर्णय दिला. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाचा निकाल गॉडसन कंपनीच्या विरोधात गेला होता. त्याला सदर कंपनीने राज्य ग्राहक आयोगाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. तेथे २३ जून २०१५ ला त्यांचे अपिल फेटाळले गेले. त्यानंतर गॉडसन कंपनीने राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे रिव्हीजन दाखल केले. परंतु आयोगाची पूर्व परवानगी न घेता परस्परच हे रिव्हीजन काढून घेतले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वकीलामार्फत रिव्हीजन दाखल केले. सुनावणीदरम्यान हा गंभीर प्रकार आयोगाच्या निदर्शनास आला. हे रिव्हीजन दाखल झालेच कसे, असा प्रश्न उपस्थित करीत आयोगाने गॉडसन कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. त्यांचे रिव्हीजन खारिज करण्यात आले. शिवाय या दोनही रिव्हीजनसाठी गॉडसन कंपनीला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड त्यांना ३० दिवसात भरण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. बाबाराव चौधरी व उत्तम नैताम यांनी अ‍ॅड. चेतन गांधी यांच्यामार्फत हे प्रकरण दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक आयोगापर्यंत लढले. चौधरी व नैताम यांनी सुरुवातीला जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना दिलासा मिळाला. तत्काळ अकृषक परवाना प्रक्रिया पूर्ण करा, ले-आऊट पूर्णत: विकसित करा व प्लॉटची खरेदी करून द्या, याचिकाकर्त्यांच्या जमा रकमेवर नऊ टक्के व्याज द्या, पाच हजार रुपये शारीरिक-मानसिक त्रासाचा खर्च आणि एक हजार रुपये तक्रार खर्च देण्याचे निर्देश ग्राहक मंचाने दिले. त्याविरोधात गॉडसन कंपनीने राज्य आयोगाकडे अपिल दाखल केले, परंतु तेथे ते फेटाळले गेले. त्यानंतर या कंपनीचे रिव्हीजन आता दिल्लीतही खारिज झाले. गॉडसन कंपनीला यवतमाळपासून दिल्लीपर्यंत चपराक बसल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्या गोरगरिबांना गंडविणाऱ्या अन्य काही डेव्हलपर्सलाही धक्का बसला आहे. फसविले गेलेले ग्राहकही आता अशा डेव्हलपर्सला धडा शिकविण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)