लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोवा मुक्ती संग्राम लढ्यातील सैनिक व येथील पाटीपुरा भागातील रहिवासी नरसिंगराव गोकुलदास रामटेके यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी १९६० मध्ये गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पालकमंत्री मदन येरावार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोवा मुक्ती संग्राम सैनिक नरसिंग रामटेके यांचे निधन
By admin | Updated: May 16, 2017 01:32 IST