शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात जा अन् विजेचे बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 10:58 IST

वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे.

ठळक मुद्देमहावितरणची सुविधा ग्रामीण ग्राहकांसाठी गावोगावी फिरणार ‘कॅश व्हॅन’

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ‘मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन’ गावोगावी जाऊन ग्राहकांकडून देयकाची रक्कम स्वीकारणार आहे. शिवाय, मोठे खेडे आणि तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारातसुद्धा ही व्हॅन फिरणार आहे.या फिरत्या वीज बिल भरणा केंद्रात संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. सोबतच महावितरणचे कर्मचारीही राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जागच्या जागी बिल भरून त्याची पावतीही मिळविता येते. शिवास, गावात व्हॅन आली हे गावकऱ्यांना कळावे म्हणून ध्वनिक्षेपकावरून सूचनाही दिली जाते.दुर्गम भागातील गावांसोबतच बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांची त्यात निवड करण्यात आली आहे. शिवाय दाट लोकवस्ती असूनही त्या तुलनेत केंद्रांची संख्या कमी असलेल्या परिसरातही ही व्हॅन फिरविली जाणार आहे. यात ग्रामीण ग्राहकांची जशी सोय होणार आहे, त्याचप्रमाणे महावितरणची वसुली वाढण्यासाठीही मदत होणार आहे. म्हणूनच वसुली क्षमता कमी असलेल्या गावांमध्ये ही व्हॅन फिरविली जाणार आहे. तूर्त राज्यातील निवडक गावांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा तीन महिन्यानंतर घेतला जाणार आहे. प्रतिसाद उत्तम असल्यास व्हॅन अधिकाधिक गावांमध्ये फिरविली जाणार आहे.यवतमाळच्या तीन गावांची निवडफिरते वीजबिल भरणा केंद्रांची सुविधा सध्या राज्यातील ५० गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यात विदर्भातील २८ गावांचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन (ता. झरी), शेंबाळपिंपरी (ता. पुसद) आणि अकोला बाजार (ता. यवतमाळ) या तीन गावांमध्ये ‘मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन’ फिरविली जात आहे. ही तीनही गावे तालुकास्थळाच्या तोलामोलाची आहेत, हे विशेष.

टॅग्स :mahavitaranमहावितरण