परकीय जुलमी राजवटीला कडवी टक्कर देऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी जिल्हाभरात दिमाखात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिवरायांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग या मिरवणुकीत सादर करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ‘रयतेला मोफत बियाणे वाटप करणारे महाराज’ असा हा मार्मिक देखावा कृषींच्या विद्यार्थ्यांतर्फे साकारण्यात आला होता.
स्वराज्य संस्थापकांचा जयजयकार ! :
By admin | Updated: February 20, 2016 00:11 IST