शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वसंत साखर कारखाना भाडे तत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:05 IST

पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ राजी : टोकाई साखर कारखान्याच्या चेअरमनसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे. यासंदर्भात टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे आता कारखाना सुरू होण्याबाबत ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गत वर्षापासून बंद पडला आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना अतिशय महत्वाचा आहे. आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद असलेला कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु आहे. हा कारखाना मराठवाड्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्यास इच्छुक आहे. या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्यासोबत उमरखेडच्या कृषी महाविद्यालयात बैठक झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत पाटील दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथराव कदम, पूर्णा साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव भोसले, विलासराव नादरे, अवंतिका कंपनीचे संचालक किसनराव देवरे, मनोज कनेवार, मधुकर पाष्टे, मोतीराम बोंडे, जितेंद्र महाजन, सुनील बागल, विजय पवार, टोकाई कारखान्याचे एमडी मालेगावकर, चिफ अकाऊंटंट इबितवार, शेतकी अधिकारी अशोक कदम यांच्यासह वसंतचे अध्यक्ष माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर आदी उपस्थित होते.या सर्व घडामोडीमुळे वसंतवर अवलंबून असलेले १७ हजार सभासद, कामगार, वाहन चालक, पुरवठाधारक व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.साखर आयुक्तांकडे प्रस्तावऊस उत्पादकांचे पेमेंट, एफआरपी, बँकेचे कर्ज, कामगारांचे वेतन तसेच आजची असलेली स्थिती यावर मात करीत हा कारखाना लवकरच भाडे तत्वावर दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविला जाईल, असे अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना