शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

जिल्हा परिषदेत नव्यांना संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा खुल्या प्रवर्गातील महिलांमधून होणार आहे. तसे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर झाले. या आरक्षणाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत आधीच संपली. विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ दिली गेली होती. आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये राजकीय अंदाज, तर्कवितर्क लावले जात आहे.

ठळक मुद्देसदस्यांचा सर्वसमावेशक सूर : फेरनिवड, सभापतींना बढती नकोच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सत्तेच्या नव्या समीकरणासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी आता नव्या चेहऱ्यांना संधी द्या, जुन्यांना रिपीट करू नका अथवा बढती देऊ नका असा सर्वसमावेशक सूर जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांमधून ऐकायला मिळतो आहे.जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा खुल्या प्रवर्गातील महिलांमधून होणार आहे. तसे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर झाले. या आरक्षणाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत आधीच संपली. विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ दिली गेली होती. आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये राजकीय अंदाज, तर्कवितर्क लावले जात आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणीही केली जात आहे. कोण कुणाला पाठिंबा देणार, कुणाकुणाची सत्ता बसणार, संभाव्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्टÑ विधानसभेत नेमकी सत्ता कुणाची बसते यावर यवतमाळ जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरण अवलंबून असल्याचे मानले जाते. राज्यात शिवसेना-राष्टÑवादी-काँग्रेस यांच्यात सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाल्यास तोच पॅटर्न जिल्हा परिषदेतही पहायला मिळेल. राज्यातील भांडण राज्यात, जिल्हा परिषदेत ते नको असे म्हणून भाजप-सेना एकत्र येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेत आता नवी सत्ता कुणाचीही बसो, परंतु नव्यांनाच संधी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेसमधून जादा सदस्य निवडून आणले म्हणून विद्यमान अध्यक्षांना रिपीट करण्याची चर्चा सुरू आहे. अन्य एखाद-दोन पदांबाबतही तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत सभापतीला बढती देऊन अध्यक्ष केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.परंतु या रिपीट व बढतीला सदस्यांचा तीव्र विरोध आहे. सर्वांना समान संधी द्या, सर्वांनाच लाभार्थी होऊ द्या असे म्हणून नव्या चेहºयांना महत्वाच्या पदांवर स्थान देण्याची मागणी होऊ लागली आहे. काँग्रेसमध्ये ज्या नेत्याने सर्वाधिक सदस्य निवडून आणले, त्यांचा प्रमुख पदावर दावा असला तरी त्यांनी यावेळी चेहरा बदल करावा, सुशिक्षित चेहºयांना संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.पुरूष मंडळींचा जोर पुन्हा उपाध्यक्षपदावरचमहिलांसाठी आरक्षण निघाल्याने पुरुष मंडळींचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे त्या सर्वांचा जोर आता उपाध्यक्ष, सभापतीपदावर राहणार आहे. स्थायी समितीसाठीही फिल्डींग लावली जाऊ शकते. गेल्या अनेक टर्मपासून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या-ना त्या कारणाने महिलांकडेच आहे. आता पुन्हा महिलाच अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे पुरुषांना दुय्यम पदांवरच समाधान मानावे लागणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद