शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पुसदकरांना न्याय द्या, अथवा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

नगरपालिकेने २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीसाठी मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय घेतला. हा वाढीव कर मालमत्ताधारकांना जाचक ठरत आहे. पालिकेने सभागृहात २० ते ३० टक्के करवाढीचा निर्णय घेतला. वाढीव करामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक फरपट होत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा एल्गार : नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील पालिकेने सभागृहात २०-३० टक्के ठरल्याप्रमाणे करवाढ केली. यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. पालिकने ही करवाढ रद्द करून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.नगरपालिकेने २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीसाठी मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय घेतला. हा वाढीव कर मालमत्ताधारकांना जाचक ठरत आहे. पालिकेने सभागृहात २० ते ३० टक्के करवाढीचा निर्णय घेतला. वाढीव करामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक फरपट होत आहे. प्रशासनाने सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे कारवाई न करता मनमानीपणे गैरकायदेशीरपणे झोन बदलविले. १०० ते ५०० टक्के करवाढ केली. ही करवाढ गैरकायदेशीर वाढविली, असा आरोप शिवसेनेने केला.या करवाढीप्रकरणी न्यायालयात कायदेशीर लढा सुरू आहे. मुळात ही कर आकारणी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने नाही. या परिपत्रकाचे उल्लंघन केले आहे. नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम ११२ ते १२२ च्या सर्वंकश तरतुदींचे पालनही करण्यात आले नाही. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना, माजी सैनिकांना करवाढीतून सूट देण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांना करवाढ माफ करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.यापूर्वीही शिवसेनेने नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन प्रशासनाला दिले होते. तरीही करवाढ मागे घेण्यात आली नाही. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. आता पुन्हा शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.प्रशासनाचा ढिसाळ कारभारपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने मालमत्ताधारकांना वेठीस धरले आहे. प्रशासनाने गैरकायदेशीर करवाढ केली, असा आरोप शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, नगरसेवक संतोष दरणे, दीपक उखळकर, दीपक काळे, रवी पांडे, परेश देशमुख, सत्येंद्र महाजन, विष्णू शिकारे, संजय बयास, दशरथ रिठे आदींनी केला आहे. करवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.