ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.सततची नापिकी, कृषी मालाला कम दर, कापसावर बोंडअळी, व्यापाऱ्यांकडून लूट आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पाऊस आणि गारपीट हे अस्मानी संकट त्यांच्यावर कोसळले आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात गारांसह पाऊस सुरु आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या स्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. मदत घोषित करण्यास दिरंगाई केल्यास जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा भारिप-बहुजन महासंघाने या निवेदनातून दिला आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, जिल्हा महासचिव अॅड.संजीव इंगळे, संघटक विशाल पोले, कोषाध्यक्ष ईश्वर तायडे, उपाध्यक्ष प्रसेनजीत भवरे, सल्लागार अजय खंडारे, प्रसिद्धी प्रमुख केशव भागवत, सहसचिव कुंदन नगराळे, तालुकाध्यक्ष अवधूत पवार, सुभाष लोखंडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
गारपिटग्रस्तांना तत्काळ मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:21 IST
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे.
गारपिटग्रस्तांना तत्काळ मदत द्या
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : भारिप-बहुजन महासंघाचे निवेदन