बोगस बियाणे : ग्राहक संरक्षण संस्थेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : तालुक्यात निकृष्ट बियाण्यांमुळे भुईमूगाचे पिकच हाती आले नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण संस्थेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तालुक्यातील भोजलासह इतर गावातील शेतकऱ्यांना अनुदानावर भुईमूगाचे बियाणे देण्यात आले होते. परंतु भुईमूगाला शेंगाच लागल्या नाही. भोजला या एकाच गावातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृषी विभागाने अद्यापपर्यंत या प्रकरणी कोणतेही पाऊले उचलली नाही. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव आगोसे, तालुकाध्यक्ष गजानन जाधव यांनी केली आहे.
भुईमूग पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या
By admin | Updated: June 1, 2017 00:21 IST