शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारू दिली, आता पाणीही द्या! यवतमाळात पालकमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:52 IST

पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमहिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नियोजनशून्य कामाच्या पद्धतीमुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष प्रयत्न करीत शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी  काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.सर्वप्रथम मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयापुढे गोळा झाले. तेथे पाण्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्या जात असतानाच पाण्यासाठी आणखी एक मोर्चा पालिकेवर धडकला. उमरसरा, संकटमोचन रोड परिसरातील सुमारे दोनशे महिलांचा हा मोर्चा आल्यानंतर दोन्ही मोर्चेकऱ्यांनी एकत्रितरित्या पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. तेथे आधीच प्रचंड पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता. दत्तचौक मागार्ने मोर्चा पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडकल्यानंतर महिलांनी सोबत आणलेले रिकामे मडके फोडून निषेध केला. एक ते दीड तास घोषणाबाजी सुरू होती. मोर्चेकऱ्यांनी पालकमंत्र्यांना फोन करून चचेर्साठी बाहेर या, म्हणून विनवणी केली. मात्र, पालकमंत्री आले नाही.पालकमंत्री न आल्याने संतप्त महिलांनी बांगड्या फोडून पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री राजीनामा द्या, या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. तर दारू दिली आता पाणीही द्या असे नारे लावत दारूच्या बॉटलही फोडण्यात आल्या. यात एक काचेचा तुकडा उडून बंदोबस्तावरील महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या डोळ्याला लागून दुखापत झाली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना दमदाटी करून निघून जाण्यास सांगितले. शेवटी मोर्चेकरी प्रचंड घोषणाबाजी करत निघून गेले. यावेळी पालकमंत्र्यांच्या घरापुढे फुटलेल्या बांगड्या मडक्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता.काँग्रेसला केवळ राजकारण करायचे आहे- पालकमंत्रीपालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बेंबळाचे पाणी आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. टंचाई जनतेला आहे, कंत्राटदाराला थोडीच आहे? पाणीपुरवठ्याची तारीख मी जाहीर केली म्हणूनच काम गतीने होत आहे. तारीख दिली नसती तर वेळ लागला असता. आता काँग्रेसवाल्यांना राजकारण करायचे आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी त्यांच्या नेत्याला प्रश्न का विचारले नाही? जनता मात्र आम्हाला पूर्ण सहकार्य करीत आहे.

टॅग्स :Waterपाणी