शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

घोन्साचे नागरिक क्वॉरंटाईन प्रक्रियेवरून झाले संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना कोविड सेंटरमधून आल्यापासून कुणी शेतकाम देण्यास तयार नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देकोविड सेंटरमध्ये हाल : संशयितांना घरीच ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील घोन्सा येथे सोमवारी पुन्हा चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासह संपर्कातील जवळपास ४५ ते ५० जणांना परसोडा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले. मात्र या सेंटरवर असुविधा असल्याने या सर्वांना घोन्सा येथे आपआपल्या घरातच क्वॉरंटाईन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. त्यावरून बुधवारपासून गावात चांगलेच रान पेटले आहे. कोविड सेंटरवर क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना घरीच क्वॉरंटाईन करावे, या मागणीला घेऊन गुरूवारी गावकऱ्यांनी प्रशासनाला घेराव घातला.यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनर, मुकूटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. परसोडा येथील क्वॉरंटाईन सेंटरवर नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात असून तेथे सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.यापूर्वी सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना कोविड सेंटरमधून आल्यापासून कुणी शेतकाम देण्यास तयार नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अनेक रोजमजुरी करणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य असून काही शेतकरीदेखिल आहे. मात्र त्यांनाही क्वॉरंटाईन केल्याने शेतीवर परिणाम होत आहे. तसेच रोजमजुरी करून पोट भरणाऱ्या गोरगरिबांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाने सुविधा द्यावी, अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये न ठेवता जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्यांना घरीच व ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, त्यांना स्थानिक पातळीवरच क्वॉरंटाईन करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय संविधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकरी-मजुरांना मुभाघोन्सा येथील प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांचे वास्तव्य आहे. या सर्वांशी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांनी चर्चा केली. या क्षेत्रातील नागरिकांना धान्याच्या किट पुरविण्यात आल्या. तसेच या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना शेतात काम करण्यासाठी जायला मुभा देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या