शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:23 IST

जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : जिल्हा परिषद सदस्याच्या पतीची कामकाजात ढवळाढवळ

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले.जिल्हा परिषद सदस्य सरिता जाधव व त्यांचे पती मोहन जाधव मंगळवारी पंचायत समितीत आले होते. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसोबत अर्वाच्य शब्दात वाद घातला. बीडीओंचा मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. नंतर मोहन जाधव यांनी पत्नीला बीडीओ मंगेश आरेवार यांच्या कक्षात कोंडून ठेवले. बीडीओंवर लांछनास्पद आरोप करण्याच्या दृष्टीने ही असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याचवेळी परिचर संगनवार यांना जाधव यांनी बीडीओंच्या कक्षात जाण्यापासून रोखले व धक्काबुक्की करून बाहेर काढले. मात्र इंदिराबाई ढोके बीडीओंच्या कक्षात पोहोचल्या व त्यांनी त्यांच्या बाजूला ठिय्या मांडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.यावेळी मोहन जाधव यांनी बीडीओंच्या कक्षाबाहेर वऱ्हांड्यात उपस्थित महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. महिला कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर फोटो काढून शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पारदर्शक कार्यप्रणालीमुळे दलालांचे धाबे दणाणले असून प्रामाणिक अधिकाऱ्यासोबत अशी लांछनास्पद घटना घडणे अतिशय दुर्दैवी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करून योग्य पोलीस बंदोबस्त करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे एका निवेदनातून केली आहे.डेप्युटी सीईओंची घाटंजीला भेटपंचायत समिती कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांनी बुधवारी घाटंजीला भेट दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या घटनेचा निषेध करीत त्यांच्याकडे सीईओंच्या नावे असलेले निवेदन सुपूर्द केले. निवेदनावर पंचायत समितीच्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद