शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनचे धोके ओळखून संघटित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:12 IST

आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना आवाहन : इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेस संघटनेचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे. प्रारंभी स्वत:चे खूप मोठे नुकसान सोसून या कंपन्या भारतातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद करण्याच्या तयारीला लागले आहे. विदेशी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक समस्यांवर येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेस संघटनेद्वारे आयोजित या शिबिराला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील व्यापारी आणि विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संघटनेचे अध्यक्ष नितीन जोशी व व्यावसायिक आलोक जैन यांनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या आॅनलाईन व्यवसायाला कसे खतपाणी घालत आहे याचे चित्र यावेळी मांडले. डुप्लीकेट व नादुरुस्त माल मिळणे, जुन्या किंवा बंद वस्तू येणे, तक्रारीसाठी चार दिवस फोन न उचलणे आदी प्रकार आॅनलाईन पद्धतीत घडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकाराने ग्राहकही त्रस्त झाले असल्याचे ते म्हणाले.यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजू निमोदिया, मधुसुदन मुंधडा, महेश करवा यांनीही मार्गदर्शन केले. ८० टक्के व्यवसाय व्यापारी करतात, आॅनलाईनचा व्यवसाय २० टक्क्यांवर पोहोचला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. व्यापाऱ्यांनी संघटित होऊन आपले व आॅनलाईनमधील रेट समान करण्यास कंपन्यांना भाग पाडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संघटनेतर्फे सर्व कंपन्यांना याबाबत ई-मेल पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. संचालन राजू जैन यांनी, तर आभार संघटनेचे सचिव निरज शाह यांनी मानले.

टॅग्स :onlineऑनलाइन