शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गझल व सूफी गायिका पूजा गायतोंडे यांची आज यवतमाळात स्वरांजली

By admin | Updated: March 23, 2016 02:16 IST

सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, २३

यवतमाळ : सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता येथील प्रेरणास्थळावर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गझल आणि सूफी गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविणाऱ्या आणि गतवर्षीचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्राप्त पूजा गायतोंडे स्वरांजली सादर करणार आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची साधना करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा या संगीताच्या निस्सीम साधक होत्या. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना आपल्या गायनातून पूजा गायतोंडे स्वरांजली अर्पण करणार आहेत. पारंपरिक रागदारीच्या साह्याने पूजा गायतोंडे गझल आणि सूफी रचना सादर करते. त्यांच्या गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविला आहे. निसर्गदत्त गोड गळा आणि अद्वितीय क्षमतेच्या बळावर पूजा आज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. अशा या प्रतिभावंत गायिकेला ‘लोकमत’च्यावतीने ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिनेअभिनेत्री शबाना आजमी आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी आयोजित मिजवान फॅशन शोमध्ये पूजाच्या स्वरांनी वेगळा रंग भरला. मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक सुवर्णपदके प्राप्त केली. दिल्लीतील जामिया मिल्लीया इस्लामिया विद्यापीठाने गायनाच्या कार्यक्रमातही पूजाला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. सुप्रसिद्ध ठाणे फेस्टिवलमध्ये पूजाचा सहभाग होता. पद्मश्री पंकज उदास आणि तलत अजीज यांनी आयोजित केलेल्या खजाना गझल फेस्टिवलमध्येही तिचे सादरीकरण महत्त्वपूर्ण ठरले. अशी ही ख्यातनाम गायिका यवतमाळकर रसिकांना आपल्या गझल आणि सूफी गायनातून मंत्रमुग्ध करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)विविध पुरस्काराने सन्मानित ४मुंबईच्या आर.ए. पोदार महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. परंतु संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्या संगीताकडे वळल्या. सीओन (मुंबई) येथील श्रीवल्लभ संगीत विद्यालयाचे विकास भाटवडेकर, धनश्री पंडित राय, लालजी देसाई, संतोष कुडव, स्वामी चैतन्य स्वरूपजी यांच्यामुळे पूजा सुगम शास्त्रीय गायनाकडे वळली. सध्या उस्ताद मुन्नावर मासूम सईद खान यांच्याकडून ती सूफी आणि गझल गायनाचे धडे गिरवीत आहे. शास्त्रीय गायनातील ख्यातनाम आग्रा घराण्याचे दिवंगत पं. सी.एस.आर. भट आणि त्यांचे शिष्य राजा उपासनी, सुनीता गांगोली यांच्याकडूनही पूजाला शास्त्रीय गायनासाठी मार्गदर्शन लाभले आहे. गायनासोबत पूजाचे हार्मोनियमवरही प्रभुत्व असून ती हार्मोनियमचे शिक्षण पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेत आहे. उस्ताद इब्राहिम दुर्वेश यांच्याकडून अस्खलित उर्दू उच्चार शिकून घेतले. त्यामुळेच पूजाची गायकी रसिकांना मंत्रमुग्ध करते. सकाळी ९ वाजता संगीतमय श्रद्धांजली४लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळात संगीतमय श्रद्धांजली सभेचे आयोजन येथील दर्डा उद्यानस्थित समाधीस्थळ येथे करण्यात आले आहे.