शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर येथे गॅस्ट्रोचा उद्रेक

By admin | Updated: July 12, 2017 01:05 IST

वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून

६० जणांना बाधा : ३० रुग्णांवर वणीत उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील ३० जणांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ३० जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. गावात गॅस्ट्रोची लागण झालयने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक गावातील काही नागरिकांना उलटी, मळमळ व हगवणीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने कायर येथील एका खासगी डॉक्टरला उपचारासाठी बाळापुरात पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहून सोमवारी दुपारी गावातील ३० गंभीर रुग्णांना दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास या सर्व रुग्णांना वणी येथे आणण्यात आले. यांपैैकी २२ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आठजण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दूषित पाण्यामुळेच गावकऱ्यांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे ते म्हणाले. राम गिरी (७०), रघुनाथ चिंचोळकर (७०), मिरा बोंडे (५०), मंगला पायघन (३०). सुनिता बुच्चे (३०), विमल भोयर (५०), देवी पानघाटे (४५), मंगला वाघाडे (१०), पौैर्णिमा वाघाडे (१७), चंद्रकला मत्ते (४५), मंगला बोंडे (३५), मिरा पिंगे (५५), कोमल बोंडे (१७), पिंकी पंधरे (१७), संतोषी कोडापे (१६), सुरेखा हनुमंते (३५), रेखा ढेंगळे (१५), कौैशल्या ढेंगळे (१०), गौैरव पंधरे (२२), मधुकर हनुमंते (५०), सुनिल पिंगे (५५), मोहन पानघाटे (४०) यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संदीप उपरे (२५), शारदा उपरे (४०), भावना संदीप उपरे (२२), पल्लवी मोहारे (१७), अनिल मोहारे (४०), सुनिता मोहारे (३२), पौैर्णिमा मोहारे (१७), मयूर मोहारे (१४) यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदर हातपंपाजवळ पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी पाण्याचा वापर पिण्यासाठी केला. - विलास नैताम, सरपंच बाळापूर (बोपापूर) हातपंपाचे पाणी दूषित बाळापूर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खताचे ढिगारे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावल्याचा दावा सरपंचांनी केला असला तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.