शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या मानधनात आर्थिक विषमतेची दरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीपासूनच बीएएमएस (आयुर्वेद), बीयुएमएस (युनानी) वैद्यकीय अधिकारी, आंतरवासीता प्रशिक्षणार्थी जीवाची पर्वा न करता सेवा देत आहे. कोविड विमा सुरक्षा कवच त्यांना नाकारण्यात आले. काही ठिकाणी संरक्षणार्थ साहित्याशिवाय सेवा देत आहे. असे असताना एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या मानधनापेक्षा मोठी तफावत ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देकंत्राटी पदभरती : आयुर्वेद डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर, भेदभाव दूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा महाराष्ट्राला घट्ट विळखा पडला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत केली जात आहे. कंत्राटी पध्दतीने पदभरती करण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाचाही समावेश आहे. याकरिता एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या मानधनात विषमतेची दरी निर्माण झाली आहे. ही बाब आयुर्वेद डॉक्टरांना चांगलीच खटकत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीपासूनच बीएएमएस (आयुर्वेद), बीयुएमएस (युनानी) वैद्यकीय अधिकारी, आंतरवासीता प्रशिक्षणार्थी जीवाची पर्वा न करता सेवा देत आहे. कोविड विमा सुरक्षा कवच त्यांना नाकारण्यात आले. काही ठिकाणी संरक्षणार्थ साहित्याशिवाय सेवा देत आहे. असे असताना एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या मानधनापेक्षा मोठी तफावत ठेवण्यात आली आहे. कंत्राटी पध्दतीने ठिकठिकाणी भरल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नवीन जागांसाठी मानधनात विषमता आहे.वैद्यकीय अधिकारी पद भरताना एमबीबीएसला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी ६० ते ८० हजार रुपये एवढे मानधन निश्चित करण्यात आले आहे. एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्यास बीएएमएस, बीयुएमएस, बीडीएस उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. त्यातही त्यांना एमबीबीएसपेक्षा अर्धेच मानधन मिळणार आहे. संधी आणि मानधन यामध्ये दुजाभाव होत आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी काढण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या अधिक जागा रिक्त असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. एमबीबीएस डॉक्टरांइतका पगार दिल्यास या जागांवर काम करण्याची तयारी बीएएमएस डॉक्टरांनी दाखविली आहे. यासंदर्भात शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे आयुर्वेद क्षेत्राचे लक्ष लागले आहे.बीएएमएस व एमबीबीएसचा दर्जा समकक्षमहाराष्ट्र शासनाच्या २६ मे १९८१ च्या शासन निर्णयानुसार आयुर्वेद चिकित्सक (बीएएमएस) आणि अ‍ॅलोपॅथी (एमबीबीएस) चिकित्सक यांचा समकक्ष दर्जा आहे. वेतन आणि इतर समान धोरण लागू करण्यात आलेले आहे. याच निर्णयानुसार एमबीबीएस आणि बीएएमएस आंतरवासीता प्रशिक्षणार्थ्यांना समान वेतन मिळते. आयुर्वेद अधिष्ठाता आणि व्याख्याता यांनाही समान वेतनाची तरतूद आहे.समान वेतन-समान धोरण हवेआयुष वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य अधिकारी, कोविड आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय अ‍ॅम्बुलन्स सर्व्हीस १०८ आदी ठिकाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्रात कार्यरत या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘समान वेतन-समान धोरण’ लागू झाले पाहिजे, असे मत ‘निमा’ स्टुडन्ट फोरम नागपूरचे अध्यक्ष डॉ.शुभम बोबडे, सचिव डॉ.वैभव ठवकर यांनी नोंदविले.

टॅग्स :doctorडॉक्टर