लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यालगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. या तस्करीतील मुख्य आरोपीच शहर पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता पांढरकवडा बायपास चौफुलीवर गांजा तस्कर दाम्पत्याला अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २० लाख रूपये किंमतीचा १०६ किलो गांजा जप्त करण्यात आला.संजय कैलास गिरी (५१), त्याची पत्नी बेला संजय गिरी (४८) रा. मुंडगाव, ता. आकोट, जि. आकोला अशी अटकेतील आरोपींची नाव आहे. त्यांनी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील वारंगल येथून गुरूवारी रात्री इंडिगो कारच्या डिक्कीमध्ये १०६ किलो गांजाचे ४७ पॉकेट भरले. हा गांजा घेऊन हे दाम्पत्य केळापूरमार्गे यवतमाळकडे येत होते. याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी जोडमोहा येथून कारचा पाठलाग सुरू केला. दुसरे पथक पांढरकवडा बायपासवरील चौफुलीवर उभे होते. तेथे सापळा रचून वाहन पकडले.झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळला. आरोपी गेल्या चार वर्षांपासून गांजा तस्करीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले. कुणाला संशय येऊ नये यासाठी तो वाहनात पत्नीला सोबत घेत होता. प्रवासादरम्यान वाहनाचे सर्व काच जाणीवपूर्वक उघडे ठेवले जात होते. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी ही दक्षता घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गांजा तस्करीत दाम्पत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:40 IST
जिल्ह्यालगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. या तस्करीतील मुख्य आरोपीच शहर पोलिसांच्या हाती लागला.
गांजा तस्करीत दाम्पत्याला अटक
ठळक मुद्देतेलंगणातून आयात : २० लाखांचा एक क्विंटल गांजा जप्त