शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

दरोड्याच्या प्रयत्नातील नागपूरची टोळी गजाआड

By admin | Updated: November 29, 2014 23:27 IST

अलिशान स्कॉर्पिओ वाहनाव्दारे घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या बेतात असलेल्या नागपूर येथील एका गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच वाहन आणि घातक शस्त्र जप्त केले.

चिचबर्डीत कारवाई : स्कॉर्पिओ, घातक शस्त्रासह पाच जणांना अटकंयवतमाळ : अलिशान स्कॉर्पिओ वाहनाव्दारे घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या बेतात असलेल्या नागपूर येथील एका गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच वाहन आणि घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री येथील अमरावती मार्गावरील चिचबर्डी शिवारातील वाघाई मंदिराजवळ करण्यात आली. राकेश मोहन गाडेकर (२७), हरदीप प्रताप टाक (३०), विनय सुनील नारनवरे (२९), संतोष अशोक मडावी (३४), राकेश बाबू बैरीलाल (३१) सर्व रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या शिरावर नागपूर येथील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथून स्कॉर्पिओ (क्र. एमएच ४० एसी ९१९१) वाहनाव्दारे आलेली एक टोळी नेर येथे दरोड्याच्या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना मिळाली होती. त्यावरून फौजदार वसंत मडावी, एएसआय अजय ढोले, विजय जाधव, प्रमोद मडावी, संतोष मडावी, इक्बाल शेख आदींचा समावेश असलेल्या पथकाने चिचबर्डी शिवारातील वाघाई मंदिराजवळ सापळा रचला. वाहन येताच ते शिताफीने थांबवून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी वाहनाची झडती घेतली असता धारदार तलवार, चाकू, मिरची पुड आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त करून पोलिसांनी संबंधित पाचही जणांना अटक केली. त्यांच्या विरुद्घ यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि ३९९ आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या ४ (२५) कलमान्वये दरोड्याचा प्रयत्न आणि घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ येथे एका व्यक्तीकडे कार्यक्रमासाठी आलो होतो. तेथून नेर येथे दरोड्याच्या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची कबुली दिल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. तसेच तो यवतमाळातील व्यक्ती एका गंभीर प्रतिबंधात्मक कारवाईत अमरावती कारागृहात होता. त्याचवेळी त्याच्याशी या टोळीचा म्होरक्या राकेश गाडेकर याच्याशी मैत्री झाल्याचेही त्यांनी पोलिसांपुढे उघड केल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)