शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:59 IST

अरे ओ सांभा... कितने आदमी थे.. शोले सिनेमातल्या गब्बरचा हा डॉयलॉग खलप्रवृत्तीच्या लोकांना घबरवणारा आहे. लोकांना लुटणाºया डाकूची तीच गर्जना कदाचित यवतमाळच्या शकुंतलेचे रक्षण करेल, ....

ठळक मुद्देरेल्वेचा नियम : २५ रुपयांचे तिकीट अन् ५०० रुपयांचा दंड

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अरे ओ सांभा... कितने आदमी थे.. शोले सिनेमातल्या गब्बरचा हा डॉयलॉग खलप्रवृत्तीच्या लोकांना घबरवणारा आहे. लोकांना लुटणाºया डाकूची तीच गर्जना कदाचित यवतमाळच्या शकुंतलेचे रक्षण करेल, असा ग्रह रेल्वेप्रशासनाने करून घेतल्याचे दिसते. त्यामुळे शकुंतलेच्या अवतीभवती घाण करणाºयांसाठी खास सूचना वजा गर्जना लावण्यात आली आहे...‘अरे ओ सांभा.. कितना जुर्माना रखे है सरकारने रेल परिसर मे गंदगी फैलाने पर?’ अशा डॉयलॉगसह गब्बरचा फोटो अन् ताबडतोब खाली सांभाचे उत्तरही...‘५०० रुपये पुरे ५०० रुपये!’यवतमाळ रेल्वेस्थानकावरून एकमेव शकुंतला रेल्वे येते आणि जाते. दिवसातून एकदा तिची चक्कर झाली की संपूर्ण स्थानकाचा परिसर जुगारी, दारूडे यांच्या तावडीत सापडतो. शकुंतलेने प्रवास करणाºयांची संख्याही अत्यल्प असल्याने स्थानकावरील या ‘आवारागर्दी’ला हटकणारेही कुणीच नसते. स्थानकावरील कर्मचाºयांची संख्या एक किंवा दोन एवढीच, त्यामुळे पायबंद घालणे अशक्य.शकुंतला एकटीच, लहानशीच आणि अत्यंत हळूवार असली तरी तिच्या रेल्वेस्थानकाचा परिसर मात्र विस्तृत आहे. भर दिवसाही तेथे अनेक गैरप्रकार सुरू असतात. रात्रीच्या अंधारात तर रेल्वेचा ट्रॅक जीवनाचा ट्रॅक चुकलेल्या तरुणांच्या ताब्यात जातो. त्यामुळे शकुंतलेच्या स्थानकावर दारूच्या बाटल्या आढळतात. दिवसभर गंजीपत्याचे डाव रंगलेले असतात. पान-खºर्याच्या पिचकाºयांनी भिंती रंगतात. मोकाट कुत्रे थेट तिकिट खिडकीच्या खालीच निजलेले असतात. हे वातावरण बदलून स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने विविध प्रकारच्या सूचना लावून पाहिल्या.पण व्यर्थ ठरल्या. त्यामुळे आता थेट डाकू गब्बरसिंगची छबी दाखवून मस्तीखोरांना पिटाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथून मूर्तिजापूरची तिकिट २५ रुपये आहे. मात्र, शकुंतलेच्या परिसरात साधे थुंकताना जरी कुणी आढळले तरी, त्याला ५०० रुपयांचा दंड लावण्यात येईल, अशी माहिती स्थानक कर्मचाºयाने दिली.गब्बरलाही घाबरेना टमरेलधारीशकुंतला रेल्वे स्थानकाचा परिसर विस्तीर्ण असून शहरवासीयांच्या वर्दळीपासून दूर आहे. त्यामुळे रेल्वेच्या रूळाचा वापर प्रात:विधीसाठी करताना अनेक जण आढळतात. विशेष म्हणजे नगरपरिषदेने लावलेले ‘फिरते शौचालय’ टाळून लोक शकुंतलेच्याच मार्गावर बसतात. अनेकांसाठी तर हा ‘स्मोकींग झोन’ बनलेला आहे. गब्बरचा फोटो आणि त्याचा खुमासदार डायलॉग चिटकवूनही हे टमरेलधारी रूळ सोडायला तयार नाही. अद्यापही ट्रॅक परिसर आणि स्थानकाच्या अगदी दारातही दारूच्या बाटल्या आढळतात. विशेष म्हणजे, स्वच्छतेसाठी दरडावणारा गब्बर चिकटविण्यात आला, पण तो स्वत:ही हातावर तंबाखूच मळताना दिसतो, यातच खरी गोम दडलीय!