शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात कोवळ्या कळ्यांचे भविष्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले.

ठळक मुद्देबालविवाहांचा सपाटा : वर्षभरात ३०, तर एकट्या एप्रिलमध्ये ८ घटना, गाव समित्या अलर्ट

अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे प्रशासन व्यस्त आहे. खेड्यापाड्यातील अनेक घातक रुढी, परंपरांना त्यामुळे मोकळे रान मिळत आहे. त्याचाच गैरफायदा घेत जिल्ह्यात कोवळ्या वयाच्या मुलींचे थोराड युवकांशी लग्न लावून देण्याची लाट आली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल आठ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या. कोरोनाची पहिली लाट थंडावल्यानंतर बालविवाहही थंडावल्याचे दिसले. मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाही वाढू लागला अन् बालविवाहदेखील मोठ्या प्रमाणात ठरू लागलेत. प्रशासनाच्या कारवाईनंतरही बालविवाहांचे घाट घातले जात आहेत.गेल्या वर्षभरात तब्बल ३० बालविवाह उघड झाले. जे उघड होऊ शकले नाही, त्यांची तर गणतीच नाही. अज्ञान, गरिबी, बेरोजगारी अशी कारणे पुढे करीत अनेकजण बालविवाहांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलगी हे परक्याचे धन मानून शक्य तेवढ्या लवकर तिला ‘उजविण्याचा’ प्रयत्न खुद्द जन्मदात्यांकडूनच केला जात आहे. इतर वेळी बालविवाह प्रतिबंध कायद्याचा धाक असतो. मात्र, सध्या संपूर्ण प्रशासन कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुरफटले आहे. दुर्गम खेड्यापाड्यातील लोक त्याचाच फायदा घेत लपूनछपून, तर कुठे उघडउघड अल्पवयीन मुलींचे विवाह करीत आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात असे तब्बल आठ बालविवाह जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चव्हाट्यावर आणले. मात्र, अद्यापही हा प्रकार थांबायचे नाव घेताना दिसत नाही. 

खंडाळा, घाटंजीत दोन प्रकरणात गुन्हेबहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले. मात्र प्रशासन परत जाताच पुन्हा लग्नाची तयारी केली अन् अवघ्या चार दिवसातच घाटंजी तालुक्यात जाऊन लग्नसोहळा पार पाडला. याही प्रकरणात घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया  १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कोरोनाच्या एक वर्षात अमरावती विभागात प्रशासनाने तब्बल ७२ बालविवाह उघडकीस आणून रोखले. त्यात विभागातील पाचही जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ बालविवाह रोखले गेले. वाशिमध्ये १२, बुलडाणा २१, अमरावती १२ तर अकोला जिल्ह्यात ५ बालविवाह रोखले गेले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात मार्चनंतरही बालविवाहांचा सपाटा सुरूच आहे. मार्चनंतर अवघ्या महिनाभरात तब्बल ८ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या. 

आणखी तीन कारवाया प्रशासनाच्या टप्प्यात कोरोनाच्या निर्बंधाआडून अत्यल्प खर्चात मुलीचे लग्न लावून देता येईल, या घाईतून बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अल्पवयातील प्रेमप्रकरणेही कारणीभूत ठरत आहे. मात्र आपण गाव बालसंरक्षण समित्यांच्या कार्यशाळा घेतल्याने या समित्या जागृत झाल्या आहे. यावर्षीच्या कारवायांचे प्रमाण गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आहे. कळंब, मारेगाव आणि बाभूळगाव तालुक्यातील आणखी तीन बालविवाहांची माहिती आली असून लवकरच कारवाई केली जाईल.           - देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी  

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या