शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महागाईविरोधात काढली शवयात्रा

By admin | Updated: October 18, 2015 02:40 IST

यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली.

मनसेचे आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवणी : यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली. ही शवयात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकून तेथे त्यांना निवेदन सादर करण्यात आले. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असतानाच महागाईचा भडका उडाला आहे. सध्या तूरडाळ ७३ रूपयांवरून १९५ रूपयांवर पोहोचली आहे. चनाडाळ ५० रूपये वरून ९५ रूपये, उडीदडाळ ७१ वरून १३० वर, मूगडाळ ७० वरून ११० वर, तर मसूरडाळ ६९ रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचली आहे. या भरमसाठ वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडल्याचा आरोप मनसेने केला आहे. जीावनावश्यक वस्तूंचे दर भडकल्याने गरीब जनतेचे मोठे हाल होत आहे. या भाववाढीचा शेतकऱ्याला एकही रूपयांचा लाभ नसून केवळ दलाल व व्यापारी भाव वाढ करून सामान्य जनतेच्या जिवावर उठल्याचा आरोपही मनसेने केला आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य शासनाने केवळ जिल्ह्यामधील दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असताना शासनाने केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप मनसेने केला आहे. संपूर्ण विदर्भच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, महागाई कमी करावी, आदी मागण्यांसाठी मनसेने ही शवयात्रा काढली होती. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.नांदेपेरा मार्गावरील मनसेच्या कार्यालयापासून ही शवयात्रा काढण्यात आली. शवयात्रेत चौघांच्या खांद्यावर महागाईची तिरडी होती. तिरडीवर विविध घोषणा लिहिलेले फलक लावले होते. शवयात्रेसमोर मनसेचा एक कार्यकर्ता आगटे धरून होता. त्या मागे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महागाई कमी करा, शासनाचा निषेध असो, आदी घोषणा देत चालत होते. ही शवयात्रा आगळीवेगळी ठरली. नागरिकांनाही प्रथमदर्शनी कुणाचा तरी मृत्यू झाला असावा, त्याचीच ही शवयात्रा असावी, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्ष बघितल्यानंतर खरी स्थिती सर्वांना कळली. दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, संतोष रोगे, रमेश सोनुले, शेख आजीद, रोशन शिंदे, उमेश वैरागडे, विनोद चोपणे, विनोद कुचनकर, मिलींद पेंदाने आदींना अटक करून गुन्हा दाखल केला. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना सायंकाळी सोडण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)